घरक्राइमलेखक राजन खान यांच्या मुलाने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटमधून कारण आले समोर

लेखक राजन खान यांच्या मुलाने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटमधून कारण आले समोर

Subscribe

पुणे : मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक राजन खान (Rajan Khan) यांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. डेबू राजन खान (27) (Debu Rajan Khan) याने पुण्यातील तळेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहिली असून त्यातून आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. (Writer Rajan Khans son ends his life The reason came from the suicide note)

हेही वाचा – वडापाव उधार दिला नाही म्हणून हॉटेल चालकाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक; अंबरनाथमधील घटना

- Advertisement -

लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान आयटी अभियंता होता. तो सोमटने फाटा येथील शिंदे वस्ती परिसरातील घरात एकटाच राहायचा. सोमवारी सकाळपासून डेबू खान याने घराचे दार उघडले नाही. त्यामुळे दुपारच्या सुमारास घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या भावाने डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने त्याने डेबूचे घर गाठले. घराचे दार ठोठावले, पण डेबूने काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याने तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचं दिसून आले. यावेळी त्यांना डेबूने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचे तसेच त्यातून फटका बसल्याचा उल्लेख होता. तसेच पैश्यांची देवाण-घेवाण केलेल्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख होता. आर्थिक विवंचनेतून डेबूने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. या आधारावर तळेगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ज्याला वडील मानले त्यानेच केली हत्या, महिला सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूचे गूढ 2 वर्षांनी उलगडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डेबू राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याच्या भावाने त्याला जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. सायंकाळी साडेसहा वाजता डाॅ. सोनवणे यांनी डेबूला मृत घोषित केले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डेबूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान डेबूचा मृतदेह राजन खान यांना देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -