घरताज्या घडामोडी११ वर्षाच्या मुलाचा बँकेत दरोडा; ३६ सेकंदात २० लाख रुपये लंपास

११ वर्षाच्या मुलाचा बँकेत दरोडा; ३६ सेकंदात २० लाख रुपये लंपास

Subscribe

११ वर्षाच्या मुलाने तब्बल २० लाखांवर डल्ला मारला असून केवळ ३६ सेकंदात ही चोरी करण्यात आली आहे.

बँकेतील दरोडा, चोरी अशा एक ना अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या अशी एक घटना समोर आली आहे ती म्हणजे केवळ ११ वर्षाच्या मुलाने तब्बल २० लाखांवर डल्ला मारला आहे. केवळ ३६ सेकंदात ही चोरी करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना हरयाणाच्या जिंद जिल्ह्यात घडली आहे.

असे आले उघडकीस?

हरयाणाच्या जिंद जिल्ह्यातील पंजाब नॅशनल बँकेत ११ वर्षाच्या मुलाने ही चोरी केली आहे. हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे की, हा मुलगा आधीपासून बँकेत कॅशिअर नसल्याचे पाहतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो. लहान असल्यामुळे बँकेतील इतर लोकांचे त्याच्याकडे लक्षही जात नाही. तो इतक्या शिताफीने चोरी करतो की कदाचित त्याने त्याआधीदेखील चोऱ्या केलेल्या असाव्यात किंवा त्याला चोरीसाठी ट्रेनिंगच दिलेले असावे.

- Advertisement -

संधी मिळताच या मुलाने चांगलाच डाव साधला. ज्यावेळी त्याने चोरी केली त्यावेळी कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही. त्यामुळे चोरी झाली तेव्हा काहीच समजले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; दुपारच्या वेळेला ही चोरी झाली होती. मात्र, जेव्हा संध्याकाळी कॅश मोजली गेली तेव्हा त्यामध्ये २० लाख रुपये कमी असल्याचे समजले आणि मग सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे सर्वकाही समोर आले.


हेही वाचा – देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -