घरमहाराष्ट्रनाशिकदेशातील दुसरी बीएसएल-3 कंटेन्मेंट प्रयोगशाळा नाशकात

देशातील दुसरी बीएसएल-3 कंटेन्मेंट प्रयोगशाळा नाशकात

Subscribe

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.पवारांच्या हस्ते उद्या लोकार्पण

नाशिक : कोरोनासारख्या इतरही सूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या वतीने बीएसएल-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनवण्यात आली आहे. देशातील दुसरी प्रयोगशाळा नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केली. 25 कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे शुक्रवारी (दि.18) सकाळी 11 वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे त्याचे लोकार्पण होणार आहे.

या सोहळ्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्रा.डॉ. बलराम भार्गव, सहसचिव अनुनगर आदी उपस्थित राहणार आहेत. देशात चार मोबाईल जैव सुरक्षा स्तर -3 प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणेे आहेत. ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील कर्मचार्‍यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून या बीएसएल-३ प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील.

- Advertisement -

या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील ज्यामुळे समाजाला धोका कमी होईल. ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या दरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान राहिल. बीएसएल-3 प्रयोगशाळा प्रादुर्भाव, क्षेत्र तपासणी, अत्याधिक संसर्गजन्य, संभाव्यपणे प्राणघातक विषाणूंचा सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात नाशिकमध्ये प्रथमच उपलब्ध होत आहे.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -