घरदेश-विदेशपश्चिम बंगालमध्ये संपावर गेलेल्या १६ डॉक्टरांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये संपावर गेलेल्या १६ डॉक्टरांचा राजीनामा

Subscribe

कोलकाताच्या आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या १६ डॉक्टरांनी राजीनामा दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, अशा परिस्थितीमध्ये आम्ही सेवा देण्यामध्ये असमर्थ आहोत, असे डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टर मारहाणीविरोधामध्ये पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलेले ऐकले नाही. ममता बॅनर्जींनी दुपारी २ वाजेपर्यंत कामावर पुन्ही रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र डॉक्टर आपल्या मागण्यावर कायम आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील याच मुद्द्यावरुन डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. बंगालच्या डॉक्टरांनी राज्यपालांची भेट घेऊन ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. ममता बॅनर्जी यांनी असे म्हटले होते की, ‘मी संपावर गेलेल्या डॉक्टरांचा निषेध करते. पोलिसवाले ड्यूटीवर असताना शहीद होतात मात्र पोलीस संपावर जात नाहीत.’

- Advertisement -

१६ डॉक्टरांनी दिले राजीनामे

कोलकाताच्या आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या १६ डॉक्टरांनी राजीनामा दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, अशा परिस्थितीमध्ये आम्ही सेवा देण्यामध्ये असमर्थ आहोत. म्हणून आम्ही आमच्या राजीनामा देऊ इच्छितो.’ तर दुसरीकडे दार्जिलिंगच्या नार्थ बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांनी राज्यातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात राजीनामा दिले आहेत.

- Advertisement -

उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू

मंगळवारी आधी जुनिअर डॉक्टर्स संपावर गेले. त्यानंतर सिनिअर डॉक्टर्स संपामध्ये सहभागी झाले. डॉक्टरांच्या संपामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा ठप्प झाली आहे. ऐवढेच नाही तर आपत्कालिन सेवा देखील ठप्प झाली आहे. कोलकाताच्या एनआरएस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर सर्व डॉक्टर्स संपावर गेले आहेत. एका रुग्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

महाराष्ट्रात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

कोलकात्यातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यासह देशभरातील निवासी डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टर्स संपावर गेले आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स ११ वाजल्यापासून काम बंद आंदोलनावर गेले आहेत. या आंदोलनामध्ये मार्ड, आस्मी आणि आयएमए ह्या संघटनांनी देखील सहभाग घेतला आहे. आंदोलना दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती लावून, savedoctors असे पोस्टर्स दाखवून, सूरक्षा द्यावी म्हणून हेल्मेट घालून हॉस्पिटलमध्ये सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. पण, या आंदोलनाचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर होणार नाही असं आश्वासन मुंबईतील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलं आहे.

हेही वाचा – 

कोलकाता डॉक्टर मारहाणीचे पडसाद राज्यात; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

अन्यथा कनिष्ठ डॉक्टरांनी हॉस्टेल खाली करावे; ममता बॅनर्जींचा डॉक्टरांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -