घरमुंबईकोलकाता डॉक्टर मारहाणीचे पडसाद राज्यात; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

कोलकाता डॉक्टर मारहाणीचे पडसाद राज्यात; डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Subscribe

राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स ११ वाजल्यापासून काम बंद आंदोलनावर गेले आहेत. या आंदोलनामध्ये मार्ड, आस्मी आणि आयएमए ह्या संघटनांनी देखील सहभाग घेतला आहे.

कोलकात्यातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यासह देशभरातील निवासी डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टर्स संपावर गेले आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स ११ वाजल्यापासून काम बंद आंदोलनावर गेले आहेत. या आंदोलनामध्ये मार्ड, आस्मी आणि आयएमए ह्या संघटनांनी देखील सहभाग घेतला आहे. आंदोलना दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती लावून, save doctors असे पोस्टर्स दाखवून, सूरक्षा द्यावी म्हणून हेल्मेट घालून हॉस्पिटलमध्ये सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. पण, या आंदोलनाचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर होणार नाही असं आश्वासन मुंबईतील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलं आहे. दरम्यान, मार्डने सांगितले की, रुग्ण आपले पहिले प्राधान्य आहे हे विसरु नका. आज जागतिक रक्तदान दिवस आहे तर रक्तदान करा, असे आवाहन डॉक्टरांना केले आहे.

आपत्कालीन सेवा सोडून इतर काम करणार नाही

आंदोलना दरम्यान ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसंच संकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत वार्डमध्येही सेवा दिली जाणार नाही. मात्र आंदोलना दरम्यान आपत्कालीन सेवा सोडून इतर काम न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. राज्यातील मार्डचे ४५०० डॉक्टर्स तर आस्मीचे २५०० डॉक्टर्स आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

कोलकात्यातील निवासी आणि दोन इंटर्न डॉक्टरांना ११ तारखेला जबर मारहाण करण्यात आली होती. कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृध्द महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या मृ रुग्णाच्या २०० नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी मंगळवारपासून तीव्र निषेध करायला सुरुवात केली.

डॉक्टरांना सुरक्षा देण्यास सरकार अपयशी

डॉक्टरांवर होणारे हल्ले त्वरीत थांबवण्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे यासाठी डॉक्टरांच्या सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. शिवाय, सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.

- Advertisement -

स्ट्रीट प्लेतून जनजागृती

पालिकेच्या नायर आणि केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी स्ट्रीट प्लेमधून डॉक्टरांना कामावर असताना कशा पद्धतीने मारहाण केली जाते हे दाखवल‌ं. केईएमच्या डॉक्टरांनी काळं टी-शर्ट आणि डोक्याला रुमाल बांधून निषेध केला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे काम बंद आंदोलन असंच सुरू राहणार आहे.

हेही वाचा – 

राज्यातील डॉक्टरांचे मारहाणीविरोधात कामबंद आंदोलन; ओपीडी सेवा बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -