घरदेश-विदेशआसाममध्ये ९ दिवसांत १६ नवजात बालकांचा मृत्यू

आसाममध्ये ९ दिवसांत १६ नवजात बालकांचा मृत्यू

Subscribe

आसाममध्ये १ ते ९ नोव्हेंबर या काळात १६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

आसाममध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ ९ दिवसामध्ये आसाममध्ये १६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील जोहरत मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हे मृत्यू झाले आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत. १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ८४ नवजात बालकांपैकी १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, नवजात बालकांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही. मुलांच्या मृत्यू मागे काही बालकांना जन्मताच आजार होते, काही बालकं ही कमी वजनाची होती अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेनं राज्यात खळबळ माजली असून आरोग्यसेवेवर टिका केली जात आहे. शिवाय, मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल देखील आता विचारला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये राजधानी गुवाहाटीवरून जोहरतला उच्चस्तरीय चौकशी कमिटी पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. जोहरतला पाठवण्यात आलेल्या समितीमध्ये युनीसेफचे सदस्य देखील आहेत. चौकशीनंतर समिती आसाम सरकारला रिपोर्ट सादर करेल अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

- Advertisement -

याप्रकरणामध्ये रूग्णालयाकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही किंवा मुलांची काळजी घेण्यामध्ये कोणतीही गल्लत झालेली नसल्याचा दावा रूग्णालयानं केला आहे. रूग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गरोदर महिलांना दाखल करून घेण्यात आलं होत. पण, त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही माहिती रूग्णालयाला नव्हती. त्यामध्ये कमी वजन असलेल्या माता किंवा कामगार महिला देखील होत्या. त्याचा परिणाम हा मुलांच्या आरोग्यवरती झाला असण्याची शक्यता यावेळी वर्तवली जात आहे. रूग्णालयामध्ये १४१ बेड उपलब्ध आहेत. पण, काही वेळेला क्षमतेपेक्षा जास्त रूग्णांना किंवा मातांना दाखल करून घ्यावं लागतं. या साऱ्या प्रकारानंतर रूग्णालयात देखील चौकशीसाठी सहा जणांची समिती नेमली आहे.

नवजात बालकांच्या मृत्यूचा दर हा आसाममध्ये जास्त आहे. २००४ साली आसाममध्ये १००० नवजात मुलांमध्ये २३७ मुलांचा मृत्यू होत होता. तर २०१४ – १६मध्ये हाच आकडा १३० पर्यत खाली आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -