घरदेश-विदेशउत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पात गोशाळांसाठी २४८ कोटींची तरतूद

उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पात गोशाळांसाठी २४८ कोटींची तरतूद

Subscribe

आज उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात गोशाळांसाठी २४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने आज आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प तब्बल ४ लाख ७० हजार ६८४ कोटी रुपयांचा आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात गोशाळांसाठी तब्बल २८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘यंदाचा अर्थसंकल्प सर्वात मोठा अर्थसंकल्प’

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘यावर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. गेल्या अर्थसंकल्पापेक्षा हा अर्थसंकल्प ११.९८ टक्के जास्त आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्या योजना प्रलंबित राहिल्या आहेत, त्या योजना आमचे सरकार पूर्ण करणार आहे.’ त्याचबरोबर ‘आमच्या सरकारवर सध्या कर्जमाफीचा दबाव नाही. त्यामुळे आम्ही अधिक योजना लागू करणार आहोत’, असे योगी म्हणाले.

- Advertisement -

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा अर्थसंकल्प

योगी सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्व वर्गाचा विचार केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त निधी देखील निश्चित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -