घरताज्या घडामोडीचीनमध्ये अडकले २५० भारतीय विद्यार्थी

चीनमध्ये अडकले २५० भारतीय विद्यार्थी

Subscribe

चीनमध्ये सध्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. यात अद्यापपर्य़ंत ८० जणांचा मृत्यू झाला असून हजारो जणांना त्याची लागण झाली आहे. याचदरम्यान चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेले २५० भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानी दूतावासाकडून या विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असून आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणा अशी मागणी त्यांनी केली आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास आणि शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या चीनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी, पर्यंटनासाठी आलेले अनेक परदेशी नागरिक अडकले आहेत. सध्या चीनमध्ये एकूण ७०० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ४५० विद्यार्थी २३ जानेवारी पूर्वीच भारतात परतले असून २५० जण परीक्षांसाठी तिथे थांबल्याने अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन भारत सरकारने दिले असून हिंदुस्थानी दूतावास या विदयार्थ्यांच्या संपर्कात आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच जे भारतीय विविध कामांसाठी चीनला गेले आहेत त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी हॉट लाईन सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात येथील भारतीय नागरिकांनी मदतीसाठी ६०० कॉल केले आहेत.

- Advertisement -

चीनबरोबरच हाँगकाँगमध्ये १७ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. थायलँडमध्ये ७, मकाऊ ५. तैवान ४, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमद्ये प्रत्येकी चार चार, जपान, फ्रान्स, मलेशियात तीन जणांना करोनानेग्रस्त आहेत. तर व्हिएतनाममद्ये दोन , नेपाळमध्ये करोनाचे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -