घरदेश-विदेशबिहारमध्ये छठ पूजेदरम्यान सिलिंडरचा भीषण स्फोट; 5 पोलिसांसह 34 जखमी

बिहारमध्ये छठ पूजेदरम्यान सिलिंडरचा भीषण स्फोट; 5 पोलिसांसह 34 जखमी

Subscribe

बिहार :  बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात छठपूजेसाठी प्रसाद बनवताना सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज तेली मोहल्ला येथे शनिवारी सकाळी एलपीजी सिलिंडरचा हा स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपास 40 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नागरिकांसह पोलिसांचाही समावेश आहे. दरम्यान जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज तेली मोहल्लामधील अनिल गोस्वमी यांच्या घरात गॅस सिलिंडरला गळती लागल्याने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही धावत आले. याचवेळी अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. सिलिंडरच्या या स्फोटात पाच पोलिसांसह 34 नागरिक जखमी झाले.

- Advertisement -

जखमी पोलिस कर्मचारी मोजीम, अखिलेश कुमार, जगलाल प्रसाद, सैफ जवान मुकुंद रावत, प्रीती कुमारी, नगरपरिषदेचे सभापतीपदाचे उमेदवार अनिल कुमार उर्फ अनिल ओडिया, गया ज्वेलर्सचे मालक पंकज वर्मा, मिराज आलम, मोहं. बिट्टू, सोनू कुमार, मोनू कुमार, महेंद्र साव, आर एन गोस्वामी, सुदर्शन कुमार, मोहम्मद. नईम, राज कुमार, प्रभात कुमार, मोहम्मद. शाहनवाज, शाहनवाज कुरेशी, छोटू आलम, मोहम्मद. अस्लम, मो. नेजाम, अमित कुमार, सुदर्शन कुमार, आदित्य कुमार, राजीव कुमार, दिलीप कुमार, अशोक कुमार, मोहम्मद. साबीर, अरबाज, छोटू आलम यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन डझन अधिक लोक या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्या चांगल्या उपचारासाठी बाहेर रेफर करण्यात आले आहे. यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल गोस्वामी यांच्या घरी छठाचा प्रसाद तयार केला जात होता त्यावेळी अचानक गॅस गळती होत सिलिंडरचा स्फोट झाला.

- Advertisement -

या घटनेवेळी कुटुंबीयांनी आरडोओरडा करत मदतीसाठी याचना केली, यावेळी मोहल्ल्यातील अनेक रहिवासी धावत आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल धाले. घरात पसरलेली आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे.


दिल्ली विमानतळावर इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागलीच कशी? सरकारचे DGCA ला चौकशीचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -