घरदेश-विदेशमहाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या, आजचे दर पाहा

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या, आजचे दर पाहा

Subscribe

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. शनिवारी कच्च्या तेलाचे दर १.२३ टक्क्यांनी घसरले असून $ 95.77 प्रति बॅरल किंमत झाली आहे. तर, WTI १.३२ टक्क्यांनी घसरले असून प्रति बॅरल $ 87.90 वर विकले जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत थोडा बदल झाला आहे.

हेही वाचा – आता २४ तासांत होणार कारवाई; फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी केंद्र सरकारने आयटी नियम बदलले

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोलचा दर 0.68 रुपयांनी वाढून 95.74 रुपये आणि डिझेलचा दर 0.58 रुपयांनी वाढून 81.99 रुपये प्रति लिटर झाला आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 0.22 रुपयांनी वाढून 96.44 रुपये आणि डिझेल 0.23 रुपयांनी वाढून 92.19 रुपये झाले आहे. दुसरीकडे बिहारमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 0.63 रुपयांनी 100.13 रुपयांनी स्वस्त होत असून 0.62 रुपयांनी घसरून 94.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. देशातील 4 शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

कोणत्या शहरांत किती दर?

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 24.24 रुपये प्रति लिटर
  • नोएडामध्ये पेट्रोल 97 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.62 रुपये आणि डिझेल 90.88 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर.
  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

हेही वाचा – चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; सामूहिक चाचणीचे आदेश, घरातून बाहेर न पडण्याचा फतवा

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -