घरदेश-विदेशतेलंगणामध्ये बसला अपघात; ४५ ठार १८ जखमी

तेलंगणामध्ये बसला अपघात; ४५ ठार १८ जखमी

Subscribe

तेलंगणा येथे बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात जगतियालमधील कोंडागट्टू घाटात ही दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने बस खोल दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेची माहित

नेमके काय घडले?

तेलंगणा राज्य रस्ते परिवहन वाहतूक पालिका (TSRTC) च्या बसला आज सकाळी भीषण अपघात झाला. ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरहून जगतियाला जात होती. या बसमधून ६३ प्रवासी होते. ही बस कोंडागट्टू या ठिकाणी पोहोचली असता, बस वळण घेताना बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्युंची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बस दुर्घटनेच्या माहितीनंतर मुख्यमंत्री के. चंद्रेशेखर राव यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -