घरमुंबईमहानायक अमिताभ यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू

महानायक अमिताभ यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू

Subscribe

राज्यातील शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना बिग बी धावून आले आहेत. शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना बिग बी आणि जया बच्चन यांनी ४ कोटींची मदत केली आहे.

बॉलिवूडचे बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. यामागील कारण देखील खास आहे. राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी केली जावी याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आता बिग बीच धावून आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी राज्यातील ३६० शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी दोन कोटी ३ लाख रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी होणार आहे. ऐवढेच नाही तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना देखील बिग बी मदत केली आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत

राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पात्र असलेल्या राज्यातील ३६० शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी बिग बी धावून आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यामधील सर्वाधिक शेतकरी विदर्भ-मराठवाड्यातील आहेत.

- Advertisement -

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

ऐवढेच नाही तर, राज्यातील ४४ शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला बिग बी धावून गेले आहेत. ४४ शहीद जवानांच्या कुटुंबातील ११२ सदस्यांना अमिताभ बच्चन यांनी २ कोटी २ लाख रुपयांची मदत दिली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ या सोनी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनच्या लॉन्चिंगवेळी अमिताभ यांनी याचा खुलासा केला होता.

केरळमधील पूरग्रस्तांना मदत

रविवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन यांनी जूहूच्या जलसा बंगल्यावर हा कार्यक्रम झाला. अमिताभ बच्चन यांनी याआधी केरळमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली होती. त्याचसोबत केरळवासियांना त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा देखील पुरवठा केला होता.

- Advertisement -

शेतकरी आत्महत्येबद्दल ऐकताच झाले होते दु:खी

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. आंध्रप्रदेशच्या विजाग येथे चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. त्यावेळी त्यांना शेतकरी ३० ते ४० हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करत असल्याचे माहिती पडले. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांना खूप दु:ख झाले आणि त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेकदा शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करत आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -