घरदेश-विदेशपॉर्न बघताय सावधान! आढळल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

पॉर्न बघताय सावधान! आढळल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

Subscribe

पॉर्न बघणं आता पडेल महागात... थेट जाल तुरुंगात... वाचा चाईल्ड पॉर्नोग्राफीसंदर्भातील नवा नियम

मोबाईलमध्ये पॉर्न बघण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ही बातमी वाचा. कारण तुमच्या फोनमध्ये पॉर्न आढळले तर तुम्हाला ५ वर्षाचा तुरुंगवास होणार आहे. विशेषत: मुलांच्या सुरक्षेशी संबधित असलेल्या पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. या नव्या बदलानुसार मोबाईल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रुपाने मुलांशी संबधित जर कोणतीही चाईल्ड पॉर्न व्हिडिओस, फोटोज आढळल्यास त्या व्यक्तिला ५ वर्षांच्या आणि दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

वाचा- भारतात पॉर्न साईट्स का होतात बंद?

चाईल्ड पॉर्न सेव्ह करणेही गुन्हाच 

हल्ली सोशल मीडियावर व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरतात. व्हॉटसअॅप, फेसबुक यांच्या मेसेज बॉक्समधून हे व्हिडिओ शेअर केले जातात. जर तुमच्या गॅलरीमध्ये कोणत्याही स्वरुपात चाईल्ड पॉर्न कंटेट  आढळला तर तुम्ही कोणतीही सबब देऊ शकणार नाही. कारण अनेकदा असे काही आढळल्यास मला मेल आला किंवा कोणीतरी हे पाठवले असे कारण पुढे केले जाते. पण आता या कोणत्याही सबबी ऐकल्या जाणार नाहीत तर थेट शिक्षेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.

- Advertisement -
वाचा –पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घालणार – केंद्र सरकार

लहान मुलांना पॉर्नमध्ये घेणे गुन्हा 

केंद्र सरकारने या आधी लहान मुलांना पॉर्नमध्ये घेणे हे गुन्हाच ठरवले होते. लहान मुलांवरील वाढत्या  लैंगिक अत्याचाराचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला होता. पण मोबाईल, कॉम्प्युटर आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये पॉर्न स्टोर करण्यासंदर्भात कोणताच उल्लेख कायद्यात करण्यात आला नव्हता. मात्र आता केंद्र सरकारने या संदर्भातील कठोर तरतूद केली आहे.

हे माहित आहे का?- पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी बनवला ‘पॉर्न व्हिडिओ’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -