घरदेश-विदेशपुरुषत्व सिद्ध करण्यासाठी बनवला 'पॉर्न व्हिडिओ'

पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी बनवला ‘पॉर्न व्हिडिओ’

Subscribe

'नंपूसक' संबोधणाऱ्या पत्नीशी बदला घेण्यासाठी पतीने पॉर्न व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठवला.

पती-पत्नीमध्ये भाडंणे नेहेमी होतात. ही भांडणे अनेकदा काही काळच टिकतात. मात्र पत्नीवर रागावलेल्या पतीने बदला घेण्यासाठी केलेले कृत्य त्याला चांगलच महागात पडलं आहे. नेहेमी ‘नंपूसक’ म्हणून संबोधनाऱ्या पत्नीला वैतागून एका पतीने स्वतःचाच पॉर्न व्हिडिओ काढून तिला व तिच्या नातेवाईकांना पाठवला आहे. पती नपूंसक असल्यामुळे बायकोने त्याला घटस्फोटाची नोटीस बजावली होती. यामुळे पत्नीने केलेल्या आरोपांना चुकीचे ठरवण्यासाठी रागात त्याने पॉर्न व्हिडिओ बनवला. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी अटक केली असून शुटिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येतो आहे. अटक केल्यानंतर पतीला न्यायालयासमोर उभे करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकार?

विभावसू (३२) असे या पतीचे नाव असून तो हैद्राबाद येथील लाल बाहदूर नगर परिसरात राहतो. अनूशा असे महिलेचे नाव असून ती कोडुंगईयुर येथील मुथामिझनगर परिसरात राहते. या दोघांचे दोन वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झाले होते. लग्नानंतर १५ दिवसात ही महिला पतीचे घर सोडून आपल्या घरी परतली. पती नंपूसक असल्यामुळे तिने घर सोडल्याचे सांगितले. पतीचे घर सोडल्यानंतर ही महिला आपल्या आई वडिलांच्या घरी राहत होती. काही महिन्यांनतर तिने पती विरोधात घटस्फोटाचा अर्ज कौंटुंबीक न्यायालयात दाखल केला. पती नपूंसक असल्याच्या आधारावर घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर पतीने पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचाच पॉर्न व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्याने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना पाठवला. व्हि़डिओ मिळाल्यानंतर पत्नीने अश्लिल मॅसेज पाठवण्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -