घरदेश-विदेश४० वर्षात ६० टक्के वन्यजीव नष्ट

४० वर्षात ६० टक्के वन्यजीव नष्ट

Subscribe

१९७० ते २०१४ या काळात जवळपास ६० टक्के वन्यजीव नष्ट झाल्याचे WWEनं दिलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. हा घंटा धोक्याची असून मानव विनाशाच्या दृष्टीनं प्रवास करत असल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे.

मानवाची होणारी प्रगती सध्या वन्य जीवांच्या जीवावर उठली आहे. आपल्या हव्यासापोटी किंवा गरजा भागवण्यासाठी माणूस आता वन्यजीवांच्या अधिवासावर देखील अतिक्रमण करू लागला आहे. त्याचा परिणाम हा जाणवू लागला असून १९७० ते २०१४ या काळात जवळपास ६० टक्के वन्यजीव नष्ट झाल्याचे WWEच्या अर्थात वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड  अहवालातून स्पष्ट झालं आहे. यामध्ये जलचर, भूचर आणि उभयचर प्राण्यांचा देखील समावेश आहे. मानवानं केलेल्या अतिक्रमाणामुळं काही जाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ही सारी परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. जगामध्ये सध्या १६,७०० जीवचरांची संख्या आहे. त्यापैकी ४००० वन्यजीवांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून समोर आलेली बाब ही धक्कादायक आहे.

मानवाचा विकास, वन्यजीवांचा ऱ्हास

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवजात सध्या वन्यजीवांच्या अधिवासावर अतिक्रमण करत आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये याचा सर्वाधिक फटका बसल्याचं वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडनं म्हटलं आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये वन्यजीवांच्या जाती या जवळपास ९० टक्के नष्ट झाल्या आहेत. वन्यजीवांच्या जाती नष्ट होण्याचं प्रमाण कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील १०० वर्षामध्ये वन्यजीवांच्या जाती नष्ट होण्याचं प्रमाण हे १०० ते १००० टक्क्यांनी वाढल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. या स्पष्ट अर्थ असाच होतो की मानव जात सध्या विनाशाच्या दृष्टीनं प्रवास करत आहे. बिघडणारं जैविक चक्र हे धोकादायकच. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या निसर्गावरती अतिक्रमण केलं जात आहे. शिवाय, हवामानामध्ये देखील बदल होत असून त्याचा परिणाम हा जैविक चक्रावरती होत आहे. त्यामुळं संभाव्य धोके टाळायचे असल्यास त्यासाठी आत्तापासून योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -