घरताज्या घडामोडीदिल्लीतील गोकुळपूरी भागातील झोपडपट्टीत भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, ३०हून अधिक झोपडपट्टी...

दिल्लीतील गोकुळपूरी भागातील झोपडपट्टीत भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, ३०हून अधिक झोपडपट्टी जळून खाक

Subscribe

दिल्लीत शुक्रवारी रात्री गोकुळपूरी भागातील एका झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यूची झाल्याची घटना घडली आहे. आता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले असून ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अग्नितांडवामध्ये जवळपास ३०हून अधिक झोपडपट्टी जळून खाक झाल्या आहेत, अशी माहिती दिल्लीच्या अग्निशमन दलाने दिली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार दिल्लीच्या अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झोपडपट्टीतील भीषण आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आताही कूलिंगचे काम सुरू आहे. ही घटना गोकुळपूरच्या मेट्रो पिलर नंबर १२ जवळची असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले की, ‘सकाळी, सकाळी ही दुःखद बातमी ऐकायला मिळाली. मी स्वतः तिथे जाऊन पीडित लोकांना भेटणार आहे.’

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा गोकुळपूरच्या झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही ताबडतोब घटनास्ठळी अग्निशमन दलाचे पथक पाठवले. तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळावरून ७ जणांचे मृतदेह मिळले आहेत.

ईशान्य दिल्ली जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, ‘रात्री १ वाजता गोकुळपूरी ठाणे क्षेत्रातील एका झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ सर्व बचाव उपकरणासोबत पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्ठळी पोहोचले. मग त्वरित अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. पहाटे ४ वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत ३० हून अधिक झोपडपट्टी खाक झाली आहे आणि ७ जणांचा मृत्यू झाला आहे.’


हेही वाचा – Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -