घरताज्या घडामोडीJammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री मोठे ऑपरेशन चालवले होते. माहितीनुसार, सुरक्षा दलाने जवळपास ४ ते ५ भागांमध्ये संयुक्त मोहीम सुरू केली होती. यामध्ये भारतीय सुरक्षा दलाने ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर गांदरबल जिल्ह्यातील काऊबाग नननेर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये २ दहशतवादी अडकल्याची माहिती समोर आले आहेत.

माहितीनुसार, शुक्रवार-शनिवार रात्री सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीराच्या काही भागांमध्ये ऑपरेशन चालवले. लष्करी कारवाईमध्ये पुलवामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मारला गेला. तर गांदरबल आणि हंदवाडमध्ये एक-एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

- Advertisement -

काश्मीरचे आयजी म्हणाले की, आम्ही गेल्या रात्री ४ ते ५ ठिकाणांवर संयुक्त मोहीम सुरू केली होती. रात्रीपासून ते आतापर्यंत मोहीम सुरू आहे. गांदरबल जिल्ह्याच्या काऊबाग नननेर भागामध्ये २ दहशतवादी अडकले होते. काश्मीरमधील ३ चकमकीमध्ये ४ दहशतावाद्यांना मारले असून पुलवामामध्ये २, गांदरबल आणि हंजदवाडामध्ये एक-एक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू-काश्मीरचे डीजीपींनी सांगितले होते की, बडगामा जिल्ह्याच्या चरारेश्रीफ आणि पुलवामा जिल्ह्याच्या नायरामध्ये सुरक्षादलाने ऑपरेशन चालवले होते. यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये ४ दहशतवाद्यांना ठार केले आहे.


हेही वाचा – Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सरपंचावर अंदाधुंद गोळीबार

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -