घरदेश-विदेशवयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी पार केले अटलांटिक महासागर

वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी पार केले अटलांटिक महासागर

Subscribe

जीन जॅक सविन यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अटलांटिक महासागर पार केला आहे. तीन महिने महासागराचा प्रवास त्यांनी केला आहे.

अटलांटिक महासागर पार करणे हे अनेकदा तरुणांनाही शक्य नसते. महासागर विशाल असल्यामुळे अनेकांना अर्ध्यातच समर्पण करतात. मात्र एका ७१ वर्षीय वृद्धांनी हा महासागर पार केला आहे. आपल्या सोबत एक विशेष बोट घेऊन या आजोबांनी तीन महिन्यात महासागरात प्रवास केला. तीन महिन्यात त्यांनी तब्बल ४,५०० किमी अंतराचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी आपल्याला लागणारा अन्नसाठा जवळ बाळगला होता. प्रवासादरम्यान त्यांनी आलेले अनूभव नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलून दाखवले आहे. जीन-जॅक सविन असे या आजोबांचे नाव आहे. हे आजोबा माजी सैनिक आहेत. वायू सेनेमध्ये यांनी पायलेट म्हणून काम केले होते.

- Advertisement -

via GIPHY

बोटीची विशेषता 

जीन-जॅक सविन (७१) यांनी प्रवासासाठी आपल्याबरोबर एक विशेष बोट घेतली होती. या बोटीचा आकार एका पिंपासारखा आहे. या बोटीत त्यांनी अन्नसाठा आणि पाणी ठेवले होते. याच बरोबर एक शौचालय आणि मनोरंजनासाठी एक छोटा टीव्ही ठेवला होता. या बोटीला बनवण्यासाठी ६८ हजार डॉलर्स खर्च करण्यात आले. या साधनांबरोबर त्यांनी स्पेन येथून सुरु केला होता. त्यांनी बोटीवर जीपीएसचा वापर केला असल्यामुळे इतरांना ते कुठे असल्याची माहिती मिळत होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -