घरदेश-विदेश90 व्या वर्धापन दिनानिमित्त वायुसेना सादर करणार एअर शो; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

90 व्या वर्धापन दिनानिमित्त वायुसेना सादर करणार एअर शो; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चंदीगडमध्ये होणार दाखल

Subscribe

चंदीगढच्या सुखना तलावावर शनिवारी भारतीय वायुसेनेची 90 वर्धापन दिन साजरी केली जाणार आहे. यावेळी फ्लाई पास्टमध्ये जवळपास 84 सैन्य विमान आणि हेलीकॉप्टर सहभाग घेणार आहेत आणि जगाला भारताच्या शौर्याचा परिचय करून देणार आहेत. या एअर शो ची मागील अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह देखील सहभागी होणार आहे. या व्यतिरिक्त पंजाब आणि हरियाणाचे राज्यपाल आणि चंदीगढचे प्रशासक सुद्धा उपस्थित राहणार आहेत. दोन्ही राज्यांचे पंजाब आणि हरियाणाचे मुख्यमंत्री सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 2:30 वाजता सुखना तलावावर एअर शो सुरू होईल. वायु सेना दिनाच्या निमित्ताने 75 एअरक्राप्ट फ्लाई पास्टमध्ये सहभागी होतील. एअर शोच्या दरम्यान 9 विमानांना स्टँड बाय ठेवला जाईल. एकूण 84 फाइटर जेट आणि हेलीकॉप्टर, मिलिट्री, ट्रांसपोर्ट विमान सुखना तलावावर आकाशामध्ये भरारी घेतील.

- Advertisement -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह चंदीगढमध्ये होणार दाखल


सांगण्यात येत आहे की, रक्षा मंत्री राजनाथ सिंह दुपारी 1:45 वाजता आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2:15 वाजता चंदीगढ पोहचतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरुवातीलाच सुखना तलावावर एअर शोमध्ये सहभागी होतील. त्यानंतर त्या चंदीगढमध्ये पंजाब राजभवनमध्ये नागरिक स्वागत समारंभामध्ये सहभागी होतील.

- Advertisement -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दोन दिवसीय दौरा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 9 ऑक्टोबर रोजी चंदीगढ सचिवालयाच्या नवनिर्मित भवनाचे उद्धाटन करतील. तसेच त्या दिल्ली जाण्यापूर्वी चंदीगढमधील पंजाब इंजीनियरिंग कॉलेजच्या शताब्दी वर्ष समारंभामध्ये 52 व्या दीक्षांत समारंभ आणि समापन समारंभामध्ये सुद्धा हजेरी लावतील.


हेही वाचा :

‘मन कस्तुरी रे’मधील ‘नाद’ रॉक साँग लाँच

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -