घरदेश-विदेशचार हात, चार पाय, चार कान असलेल्या बाळाचा जन्म, पण...

चार हात, चार पाय, चार कान असलेल्या बाळाचा जन्म, पण…

Subscribe

जन्मदाती आई गुलका बाई आणि राहुल गार्वे दोघेही दिव्यांग आहेत. दोघेही अंध असून मोलमजुरी करून आपलं पोट भरतात. तसंच, त्यांना एक वर्षाची मुलगीदेखील आहे.

भोपाळ – एका महिलेने चार हात, चार पाय आणि चार कान असलेल्या एका बाळाला जन्म दिला आहे. मध्य प्रदेशातील खंडावामध्ये ही दुर्मीळ घटना घडली आहे. ऐन नवरात्रीत असे बाळ जन्माला आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

खंडवा जिल्ह्यातील मुंदी येथील सरकारी रुग्णालयात शिवरिया गावाची रहिवासी गुलका बाई या प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. आज सकाळी त्यांनी बाळाला जन्म दिला. या नवजात बाळाला चार हात, चार पाय, चार कान होते. जन्मावेळी या बाळाची प्रकृती स्थिर होती. मात्र, थोड्यावेळाने या बाळाचा मृत्यू झाला. चार हाता-पायांचं बाळ जन्माला आल्याने लोकांनी गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्या बाळाला अंगठा तोंडात घालायची सवय आहे का ? मग अशी सोडवा सवय

जन्मदाती आई गुलका बाई आणि राहुल गार्वे दोघेही दिव्यांग आहेत. दोघेही अंध असून मोलमजुरी करून आपलं पोट भरतात. तसंच, त्यांना एक वर्षाची मुलगीदेखील आहे.

- Advertisement -

आशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की, गरोदर महिलेची नियमित तपासणी सुरू होती. तिला आयर्नच्या गोळ्याही देण्यात आल्या होत्या. लसीकरणही पूर्ण झालं होतं. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफी केली होती. या सोनोग्राफीत बाळ अविकसित असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यावरून तिला गर्भपात करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, गर्भपातासाठी महिलेने नकार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -