घरदेश-विदेशसंजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह विधानाबाबत दिल्लीत गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह विधानाबाबत दिल्लीत गुन्हा दाखल

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची देतानाचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यासंदर्भाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, असे राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता ते वादात सापडले असून त्यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे.

- Advertisement -

सूड भावनेने तक्रार – संजय राऊत
मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -