घरदेश-विदेशAir India : एक नियम मोडला अन् डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 80...

Air India : एक नियम मोडला अन् डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 80 लाखांचा दंड

Subscribe

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडिया कंपनीकडून दोन नियमांचे उल्लंघन झाले आहे. डीजीसीएने जानेवारीमध्ये एअर इंडियाचे ऑडिट केले होते. त्यात उड्डाण सेवा कालावधी मर्यादा (FDTL) आणि चालक दलासाठी थकवा व्यवस्थापन प्रणाली (FMS) संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे पुरावे सापडले होते. त्या आधारे डीजीसीएने एअर इंडियाला हा दंड ठोठावला आहे. (A rule was broken and DGCA slapped a fine of 80 lakhs on Air India)

हेही वाचा – Prithviraj Chavan : मोदी सरकारचा रडीचा डाव; बँक खाती गोठवल्याने पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

- Advertisement -

डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले की, एअर इंडिया लिमिटेडचे ​​स्पॉट ऑडिट यावर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. त्यातील अहवाल आणि पुराव्यांच्या विश्लेषणातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. एअर इंडिया लिमिटेडने काही प्रकरणांमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन्ही क्रू सदस्यांसह उड्डाण केले होते. हे उड्डाण करताना एअर इंडियाने क्रूला पुरेशी विश्रांती दिली नाही. याशिवाय लांब उड्डाणांच्या आधी आणि नंतर विश्रांती देण्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे ऑडिटमध्ये निदर्शनास आले आहे. जे विमान नियम, 1937 च्या नियम 28A च्या उप-नियम (2) चे थेट उल्लंघन होते, असे डीजीसीएने म्हटले आहे.

डीजीसीएने असेही म्हटले की, एअर इंडिया कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी साप्ताहिक विश्रांती दिली आहे. याव्यतिरिक्त, लांब पल्ल्याच्या उड्डाणांच्या आधी आणि नंतर उड्डाण कर्मचाऱ्यांना कमी विश्रांती दिली असल्याचे आढळले आहे. हे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांशी संबंधित FDTL च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. तपासादरम्यान ड्युटी वेळेपेक्षा जास्त उड्डाण करणे, प्रशिक्षणाच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने मांडणे, ड्युटी ओव्हरलॅप करणे आदी प्रकरणेही उघडकीस आल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Iqbal Singh Chahal : चहल थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अप्पर मुख्य सचिवपदी झाली नियुक्ती

दरम्यान, याआधीही डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई विमानतळावर 80 वर्षीय प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. व्हीलचेअरअभावी प्रवाशांना धावपट्टीवरून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले. नंतर पडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -