घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार २३ मार्च २०२४

राशीभविष्य : शनिवार २३ मार्च २०२४

Subscribe

मेष – मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या योग्य डावपेचाचे परिणाम दिसतील. दर्जेदार नवीन परिचय होतील. यश मिळेल.

वृषभ – प्रकृती अस्थिर राहील. मन चंचल होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन परिचयाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करता येईल ते पाहा.

- Advertisement -

मिथुन – घरात आनंदी वातावरण ठेवता येईल. मनावरील दडपण कमी होईल. दिवस आनंदात जाईल. धंद्यात वाढ होईल.

कर्क – घरातील सदस्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. मन उदास राहील. कामाचा व्याप वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

- Advertisement -

सिंह- मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. मोठी खरेदी होईल. मौजमजेत वेळ जाईल. नवीन व्यक्तीचा परिचय होईल.

कन्या – दुसर्‍यांच्या विचारांचा आदर करा म्हणजे संघर्ष टळेल. खाण्याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. धंद्यात नवे काम मिळेल.

तूळ – ठरविलेल्या कार्यक्रमात उत्साहाने कामे होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

वृश्चिक – शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. नोकरवर्गाची नाराजी दूर करा. मागील थकबाकी वसूल करा. पाहुणे येतील.

धनु- अपेक्षित कामे पूर्ण होतील. दर्जेदार व्यक्तीचा परिचय होईल. आत्मविश्वासाने कठीण काम पूर्ण करता येईल.

मकर- घरातील प्रश्नांमुळे मन अस्थिर होईल. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. दुसर्‍याचे विचार ऐकून घ्या.

कुंभ- कामात उत्साह वाढेल. खरेदी कराल. पाहुणे येतील. कार्यक्रम ठरविल्याप्रमाणे पार पडेल. समाधान मिळेल.

मीन – प्रयत्नाने यश खेचून आणा. धंद्यातील नुकसान टाळता येईल. नोकरवर्गाचे सहकार्य मिळेल. कोर्ट केस जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -