घरमहाराष्ट्रपुणेPrithviraj Chavan : मोदी सरकारचा रडीचा डाव; बँक खाती गोठवल्याने पृथ्वीराज चव्हाण...

Prithviraj Chavan : मोदी सरकारचा रडीचा डाव; बँक खाती गोठवल्याने पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणूक घोषित झाली असताना मोदी सरकारने काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्यासाठी पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला आहे. (Modi governments dirty trick Prithviraj Chavan aggressive after freezing bank accounts)

हेही वाचा – Iqbal Singh Chahal : चहल थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अप्पर मुख्य सचिवपदी झाली नियुक्ती

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशातील प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला प्राप्तिकर भरावा लागत नाही. मात्र, पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा ताळेबंद व्यवहार निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. 2017-18 मध्ये काँग्रेसला काही देणग्या मिळाल्या होत्या. केरळमधील पुराच्या घटननंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी देशभरातून एक महिन्याचा निधी जमा करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविला होता. या गडबडीत पक्षाला मिळालेल्या देणग्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यायला आठवडाभर उशीर झाला.

माहिती उशिरा दिल्याचा दंड दहा हजार रुपये आहे. मात्र, प्राप्तिकर विभागाला आठ वर्षांनी जाग आली असून त्यांनी पक्षाला आता नोटीस पाठवून 210 कोटी रुपयांचा दंड बजावला आहे. हा दंड भरला नाही म्हणून प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाची चार बँकांतील 11 खाती गोठविली आहेत. त्यामुळे आता आम्हाला दहा रुपयांचा व्यवहारही करता येणार नाही. विजयाचा आत्मविश्वास गमावलेले मोदी निवडणुकीत आमचा पराभव व्हावा म्हणून हे करत आहेत. ही कसली लोकशाही? सीताराम केसरी खजिनदार असतानाच्या काळात 1994 मधील त्रुटीची नोटीस पक्षाला बजावण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळेल, पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील त्याचे काय? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rani Lanke : अहमदनगर दक्षिण मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत; निलेश लंकेंच्या पत्नीचे उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य

निवडणूक रोख्याचा कायदा घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तो बरखास्त केला आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून छापा टाकून देणग्या घेण्याचे भाजपाचे खंडणीचे मोठे जाळे आता उघड झाले आहे. जनतेने आता ही निवडणूक हाती घेत देशातील लोकशाही कायम ठेवली पाहिजे. तसेच हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. त्यामुळे बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी जरा सांभाळून राहिले पाहिजे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थतीमध्ये आम्ही न डगमगता ताकदीने लढून महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय देण्यासाठी झटणार आहोत, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, पत्रकार परिषदेत पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -