घरट्रेंडिंगसेल्फीमुळे तरुणाची तुरुंगातून सुटका

सेल्फीमुळे तरुणाची तुरुंगातून सुटका

Subscribe

दर महिन्याला एकतरी व्यक्ती सेल्फी घेताना दगावल्याची घटना घडते. परंतु, आता याच सेल्फीच्या नादामुळे टेक्सासच्या एका तरुणाची तुरुंगातून सूटका झाली आहे.

हल्ली सेल्फीचा ट्रेंड आहे. आजची तरुण पिढी बाहेर कुठेही फिरायला गेली की, सेल्फी काढल्याशिवाय राहत नाही. परंतु याच सेल्फीच्या नादापाई बऱ्याच तरुणांचा दरीत कोसळून किंवा नदी, समुद्रात पडून आपला जीव गमवावा लागला आहे. दर महिन्याला एकतरी व्यक्ती सेल्फी घेताना दगावल्याची घटना घडते. परंतु, आता याच सेल्फीच्या नादामुळे टेक्सासच्या एका तरुणाची तुरुंगातून सूटका झाली आहे.

हेही वाचा – सेल्फीमुळे होणारे मृत्यू; ‘हे’ अॅप रोखणार

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

टेकसॉस देशाचा २१ वर्षीय ख्रिस्तोफर प्रिकोपियावर त्याच्या माजी प्रेयसीने गंभीर आरोप केले होते. ख्रिस्तोफरने आपल्या घरी येऊन आपल्यावर प्राण घातक हल्ला केल्याचा आरोप या तरुणीने केला होता. त्यानंतर पोलिसांनी ख्रिस्तोफरला अटक केली होती. त्याचबरोबर न्यायालयाने त्याला ९९ वर्षाचा तुरुंगवासही सुनावला होता. ख्रिस्तोफरने न्यायालयात खुप सांगण्याचा प्रयत्न केला की, ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी आपण कुटुंबासोबत बाहेर गेलो होतो. परंतु, पुरावा अभावी ख्रिस्तोफरला शरणागती पत्कारावी लागली होती. त्यानंतर दीड लाख डॉलर भरल्यावर त्याची जामीनावर सूटका झाली होती.

हेही वाचा – पत्नीच्या सेल्फीवर विचारा, मी वाटच पाहातोय – मुख्यमंत्री

- Advertisement -

आईने काढला होता सेल्फी

ख्रिस्तोफरच्या माजी प्रेयसीने २० सप्टेंबरच्या रात्री आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार केली होती. परंतु, याच दिवशी ख्रिस्तोफर आपल्या परिवारासोबत बाहेर गेला होता. ते ठिकाण त्याच्या तक्रार करणाऱ्या प्रेयसीच्या घरापासून फार लांब आहे. ख्रिस्तोफरच्या आईने त्यादिवशी एक फोटो सोशल मीडियामध्ये टाकला होता. त्या फोटोसोबत वेळ आणि ठिकाणही टाकले होते. ही बाब जेव्हा ख्रिस्तोफरच्या लक्षात आली तेव्हा त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी ख्रिस्तोफरची निर्दोष सूटका केली आहे.


हेही वाचा – मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘सेल्फी विथ माय मराठी शाळा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -