घरदेश-विदेशसंयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत प्रत्येक पाचवा भारतीय असेल वृद्ध

संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत प्रत्येक पाचवा भारतीय असेल वृद्ध

Subscribe

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून चीन दुसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी संयुक्त राष्ट्रांने जाहीर केलेल्या अंदाजानुसार (According to estimates released by the United Nations) 2050 पर्यंत प्रत्येक पाचवा भारतीय वृद्ध होणार असून पुढील तीन दशकांपर्यंत भारताची लोकसंख्या वाढण्याची अपेक्षा आणि त्यानंतर ती कमी होण्यास सुरुवात होईल.
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यानंतर चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे. चीनची लोकसंख्या आता 1425.7 दशलक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताने प्रजनन क्षमता बदलाची पातळी गाठली आहे. मात्र, वेग ही पातळी वेगाने वाढल्यास लोकसंख्या आणखी वाढेल. प्रतिस्थापन पातळी ही प्रजनन क्षमता पुनरुत्पादनाची पातळी आहे ज्यावर लोकसंख्या प्रत्यक्षात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये स्वतःला बदलत असते.

तीन दशकांपर्यंत लोकसंख्या वाढेल आणि नंतर घट होईल
संयुक्त राष्ट्रांने सांगितले आहे की, भारताची लोकसंख्या पुढील तीन दशकांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर ती कमी होण्यास सुरुवात होईल. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स-2022’ नुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 1668 दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर चीनची लोकसंख्या घटून 1317 दशलक्ष होईल.

- Advertisement -

2050 पर्यंत प्रत्येक पाचवा भारतीय वृद्ध होणार
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार वृद्ध लोकसंख्या (मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडील आणि पश्चिम राज्यांमध्ये) 2030 पर्यंत जवळजवळ दुप्पट होऊन 192 दशलक्ष होईल. त्यामुळे 2050 पर्यंत प्रत्येक पाचवा भारतीय वृद्ध होईल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. त्यामुळे शासनाने सर्वांची समान काळजी घेण्याची योजना आखणे आवश्यक असून वृद्धांच्या आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल, कारण भारताची लोकसंख्या राज्यानुसार बदलते. केरळ आणि पंजाबमध्ये वृद्ध लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या विश्लेषणात असे दिसून आले

तरुण हे नवीन विचार आणि शाश्वत उपायांचे स्रोत असू शकतात
भारताने १.४ अब्ज लोकसंख्येकडे १.४ अब्ज संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रामधील भारताचे प्रतिनिधी आणि भूतानचे देश संचालक आंद्रिया वोजनर यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्वात मोठा युवा गट असलेला देश (१५-२४ वयोगटातील २५४.१५ दशलक्ष तरुण) नावीन्य, नवीन विचार आणि शाश्वत उपायांचा स्रोत असू शकतो. जर महिला आणि मुलींना समान शैक्षणिक, कौशल्य-निर्मिती संधी, तंत्रज्ञान, डिजिटल नवकल्पनांमध्ये प्रवेश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे प्रजनन अधिकार आणि पर्यायांचा पूर्णपणे वापर करण्यासाठी माहिती आणि सामर्थ्यासह मुलींना सुसज्ज केले तर ते मार्गक्रमण वाढू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -