घर देश-विदेश Chandrayaan-3 च्या यशानंतर आता गगनयानची चाचणी; आधी महिला रोबोट नंतर अंतराळवीर जाणार,...

Chandrayaan-3 च्या यशानंतर आता गगनयानची चाचणी; आधी महिला रोबोट नंतर अंतराळवीर जाणार, कधी ते वाचा?

Subscribe

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) शास्त्रज्ञ आता गगनयान मोहिमेत व्यस्त झाले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गगनयान मोहिमेला सुरूवात होणार आहे. इस्रो महिला रोबोट व्योमित्रला (female robot vyomitrala) अवकाशात पाठवणार आहे. जेणेकरून भविष्यात मानवांना अवकाशात पाठवता येईल. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, गगनयान मोहीमेला ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होईल. (After the success of Chandrayaan 3 Gaganyaan is now being tested First female robots then astronauts ever read that)

हेही वाचा – हनीट्रॅपचे प्रमाण वाढले, केंद्राच्या गुप्तचर विभागाने जवानांना पाठवल्या नोटीस

- Advertisement -

गगनयान मोहिमेसाठी वापरण्यात येणारे व्योमित्र महिला रोबोट इस्रोने 24 2020 रोजी जगासमोर आणला होता. व्योमित्र रोबोट सध्या बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे व्योमित्र रोबोटला जगातील सर्वोत्कृष्ट स्पेस एक्सप्लोरर ह्युमनॉइड रोबोटचा पुरस्कार मिळाला आहे. व्योमित्र रोबोट अवकाशात पाठवण्यात आल्यानंतर मानवांनासुद्धा अवकाशात पाठवण्याच्या तयारीत इस्रो आहे.

चांद्रयान-3 च्या आधी प्रेक्षपित होणार होते गगनयान

- Advertisement -

जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड-19 महामारीमुळे गगनयान मोहिमेला उशीर झाला आहे. गगनयान मिशन हे मानवरहित आहे. अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे आणि त्यांना परत आणणे महत्त्वाचे असते. त्यामुळे दुसऱ्या मोहिमेत एक महिला रोबोट पाठवण्यात येणार आहे. महिल रोबोटमध्ये मानवाप्रमाणे सर्व कामे करण्याची क्षमता आहे. त्यामुळे गगनयान मिशनमध्ये सर्व काही ठीक असेल तर इस्रो पुढील प्रवास करेल, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा – Train Accident : मदुराईत ट्रेनच्या खासगी डब्याला आग, 10 जणांचा दुर्दैवी अंत

गगनयानाची सर्व यंत्रणा श्रीहरिकोटाला पोहचली

विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, गगनयान मोहिमेत आम्ही चाचणी वाहनाचा वापर करून एस्केप सिस्टमची Inflight Abort Test करणार आहोत. एस्केप सिस्टम हा गगनयानमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत चाचण्या करून बघायच्या आहेत. सर्व कामे सुरळीत असून व्हेईकल क्रोम मॉड्यूलसह सर्व यंत्रणा श्रीहरिकोटा याठिकाणी पोहचली आहे, अशी माहिती उन्नीकृष्णन यांनी दिली.

- Advertisment -