घरदेश-विदेशKashmir terror attack: अफगाण युद्धातील दहशतवादी 'पुलवामा'चा सूत्रधार

Kashmir terror attack: अफगाण युद्धातील दहशतवादी ‘पुलवामा’चा सूत्रधार

Subscribe

जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा अब्दुल गाझीचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.  

गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. दरम्यान, अफगाण युद्धातील दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा अब्दुल गाझीचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. अमेरिकी सैन्याविरोधातील कारवायांसाठी मसूद अझहरने अब्दुल रशीदला अफगाणिस्तानमध्ये पाठवले होते. काल पुलवामामध्ये झालेला हल्ला हा गेल्या २ दशकांतील सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरचा विश्वासू साथीदार अब्दुल रशीद असल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मागील काही महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी मसूद अझहरचा पुतण्या आणि भाच्याचा चकमकीत खात्मा केला होता. ते दोघेही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी घुसले होते. दरम्यान, हे दोघेजण मारले गेल्यानंतर सूदने त्याचा विश्वासू साथीदार अब्दुल रशीदला जम्मू- काश्मीरमध्ये पाठवले. यासंदर्भातील माहिती गुप्तचर यंत्रणांनादेखील मिळाली होती. विशेष म्हणजे अब्दुल रशीद हा आयईडीद्वारे स्फोट घडवण्यासाठी ओळखला जातो. पुलवामा येथील हल्ला हा आयईडीद्वारेच करण्यात आल्यामुळेही रशीद आणि या हल्ल्याचा थेट संबंध जोडला जात आहे.

- Advertisement -

टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेवर झालेल्या हल्ल्यातील  सूत्रधार अफजल गुरु याला फाशीची शिक्षा देऊन ९ वर्षे झाली. यादरम्यान अब्दुल गाझी याला मसूद अझहरने काश्मीरमध्ये संदेश पाठवला होता. ‘काही तरी मोठं व्हायला हवं, हिंदुस्थान रडला पाहिजे’, अशा अर्थाचा संदेश दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अब्दुल रशीद हा ‘जैश’ संघटनेच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरील प्रमुख देखील होता. अब्दुलने मागीलवर्षी दोन साथीदारांसोबत भारतात घुसखोरी केली होती. त्यावेळी अफझल गुरु समर्थकांनी  ‘जैश’ समर्थकांच्या ‘टेलिग्राम’वरील ग्रुपवर ‘१०० हिंदूंची हत्या’ असा मेसेज पाठवला होता. त्यामुळे या गटाचा आणि पुलवामा हल्ल्याचा काही संबंध आहे का? याची तपासणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -