घरदेश-विदेशPulwama attack : पुलवामा भ्याड हल्ल्याची धमकी खरी ठरली!

Pulwama attack : पुलवामा भ्याड हल्ल्याची धमकी खरी ठरली!

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची धमकी खरी ठरली आहे. ५ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या झालेल्या एका रॅलीमध्ये भारतावर हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या पुलवामा जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला हा इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याआधी पाकिस्तानामध्ये दहशतवाद्यांनी अनेक रॅली घेतल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ५ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या झालेल्या एका रॅलीमध्ये भारतावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

मोदी तुमची फौज घेऊन काश्मीरमधून परत जा

‘आज तक’च्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदच्या कराची येथील रॅलीमध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरुच्या नावाखाली आत्मघाती हल्लेखोरांचं पथक बनवण्याची घोषणा केली होती. आत्मघाती हल्लेखोरांची सात पथकं भारताच्या विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत अशी घोषणा या रॅलीमध्ये करण्यात आली होती. याशिवाय रॅलीदरम्यान दहशतवादी हाफिज सईदने पंतप्रधान मोदींच्या नावाने धमकी देत, ‘मोदी तुमची फौज घेऊन काश्मारमधून परत जा’, असा इशारा दिला होता. जर फौज घेऊन काश्मीरमधून गेला नाहीत तर बरंच काही गमवावं लागेल’, अशी धमकी दहशतवादी हल्ला झाला आहे. याशिवाय हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या १२ सदस्यांचं पथक देखील विशेष विमानाने घटनास्थळी पोहोचणार आहे.

- Advertisement -

वाचा – Kashmir terror attack: अफगाण युद्धातील दहशतवादी ‘पुलवामा’चा सूत्रधार

वाचा – Pulwama attack : दहशतवादी हल्याचे पडसाद; गृहमंत्री जाणार काश्मीरला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -