घरदेश-विदेशपाकिस्तानकडून आज पुन्हा गोळीबार; भारताचे प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून आज पुन्हा गोळीबार; भारताचे प्रत्युत्तर

Subscribe

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान सैनिकांकडून पुंछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मात्र, त्याचा भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले आहे.

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणावचे वातावरण असताना जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी (आज) सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तान सैनिकांकडून पुंछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने केजी सेक्टरमध्ये गोळीबार केला. मात्र, या कारवाईला उत्तर म्हणून भारतीय सेनेनेकडूनही पाकिस्तानावर तात्काळ कारवाई करण्यात आली. पाकिस्तानाकडून अखनूरमधील केरी बट्टल भागावरही गोळीबार करण्यात आला. तसेच राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्येही पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. ANI वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा घटनाक्रम

जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यामध्ये १४ फेब्रुवारी रोजी ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने त्याचे एअर सर्जिक्स स्ट्राइकने पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिले होते. मात्र, त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्र उल्लघंन हे चालूच होते. २८ फेब्रुवारी रोजी सुद्धा जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमधील एलओसीजवळ पाकिस्तानाकडून गोळीबार करण्यात आला होता. आतापर्यंत पाकिस्तानाकडून अखनूर, नौशेरा आणि पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. ४ मार्च रोजी पहाटे एलओसीवर साधारणत: साडेतीन तास गोळीबार चालू होता. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -