घरदेश-विदेशAkshaya Tritiya Gold Price 2021: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग,...

Akshaya Tritiya Gold Price 2021: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

Subscribe

आज देशभरात 14 मे रोजी अक्षय्य तृतीया सण साजरा केला जात आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा सण. या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने सोन्याची खरेदी करतात. अक्षय्य तृतीया सणाला मोठं महत्त्व असल्याने एक ग्रॅम का होईना पण सोने खरेदी आवर्जून केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूमध्ये निरंतर वृद्धी होते असे मानतात. म्हणूनच लोक सोने खरेदी करतात.

अक्षय तृतीयेच्या पूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे समोर आले होते. मंगळवारी सोने-चांदी दोन्हींचे दर घसरले होते, तर बुधवारीही बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या घसरणीसह व्यापार सुरू आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदा 0.32 टक्क्यांनी घसरले आणि सकाळी पावणे दहा वाजता सोनं 47 हजार 480 रूपये प्रति दहा ग्रॅमच्या किंमतीवर व्यापार झाला. त्याच वेळी, चांदीचा वायदा 0.76 टक्क्यांनी घसरून 67 हजार 820रुपये प्रतिकिलोग्रॅमवर व्यापार करीत आहे. तर आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 44 हजार 720 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 45 हजार 720 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45 हजार 900 इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 49 हजार 900 इतका आहे.

- Advertisement -

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबईत प्रति १० ग्रॅम सोनं 45 हजार 490 रुपये तर चांदी प्रति किलो 72 हजार 130 रुपये, नागपूरात प्रति 10 ग्रॅम सोनं 45 हजार 750 रुपये तर चांदी 711 रुपये, नाशिकात 10 ग्रॅम सोनं 47 हजार 900 रुपये तर चांदी प्रति किलो 71 हजार 800 रुपये, पुण्यात प्रति तोळा 48 हजार 550 रुपये तर चांदी प्रति किलो 72 हजार 130 रुपये इतका आहे.

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त?

अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही वेळी करता येते. तर कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय्य तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करु इच्छित असाल, तर मग जाणून घ्या सर्वात शुभ मुहूर्त कोणते आहेत

  • सकाळी 7:30 ते 9:43 पर्यंत
  • दुपारी 12:10 ते सायंकाळी 4:39 पर्यंत
  • सायंकाळी 6:50 ते रात्री 9:08 पर्यंत
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -