घरदेश-विदेशअ‍ॅलोपॅथी वाद : बाबा रामदेवविरोधात आज देशभरातील डॉक्टर्स निदर्शनं करणार

अ‍ॅलोपॅथी वाद : बाबा रामदेवविरोधात आज देशभरातील डॉक्टर्स निदर्शनं करणार

Subscribe

अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या टीकेवरुन बाब रामदेव आणि डॉक्टर्स यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे. बाब रामदेव यांचा निषेध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर्स आज मंगळवारी निदर्शनं करणार आहेत. एकीकडे कोरोना वाढत असताना डॉकटर्स निदर्शनं करणार असल्यानं सरकारची चिंता वाढली आहे.

बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार कुचकामी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना पत्र पाठवून त्यांचं वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं. मात्र, तरी देखील हा वाद काही मिटताना दिसत नाही आहे. दरम्यान, आता केवळ खासगी डॉक्टर्स नाही तर सरकारी डॉक्टर्स देखील निदर्शनं करणार आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून बाबा रामदेवविरोधात देशभरातील डॉक्टर्सनी निदर्शनं करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

सोमवारी फेडरेशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर असोसिएशन (फोर्ड), इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फेमा यांच्यासह अनेक वैद्यकीय संघटनांनी बाबा रामदेव यांच्याविरोधात निषेध जाहीर केला आहे. यात कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी रुग्णालयात कार्यरत रहिवासी डॉक्टरांनी निदर्शनात सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे.

महामारीच्या संकटात लोकांचा जीव वाचवणं पहिली प्राथमिकता असून वैद्यकीय यंत्रणेत कोणताही अडथळे न येता निषेध केला जाणार असल्याचं वैद्यकीय संघटनांनी सांगितलं. सरकारने बाबा रामदेव विरोधात कायदेशीर कारवाई केली नाही तर अजून आक्रमक होऊ असा ईशारा देखील वैद्यकीय संघटनांनी दिला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -