घरमनोरंजनHBD:'मॅडी'भूमिकेतून तरुणींना घायळ करणार्‍या'आर.माधवनची'खर्‍या आयुष्यातील लव्हस्टोरी वाचा

HBD:’मॅडी’भूमिकेतून तरुणींना घायळ करणार्‍या’आर.माधवनची’खर्‍या आयुष्यातील लव्हस्टोरी वाचा

Subscribe

माधवनने त्या संधीचा फायदा घेत सरिताला थेट प्रपोज केलं. आणि काही दिवसातच त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघही जोडप्यांना एक मुलगा देखिल आहे.

अभिनेता आर.माधवन(R.Madhavan) याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारी भूमिका ठरली ती ‘रेहना है तेरे दिल मे’(Rahna Hai Tere Dil Mai) या चित्रपटातील ‘मॅडी’ (Maddy) या पात्राची. मॅडीने लाखो तरुणींना अक्षरश: वेड लावलं होतं. मॅडीची जादू आजही कायम आहे. आजही अनेक मुलींना मॅडी सारखा प्रियकर आपल्या आयुष्यात यावा असे वाटते. मात्र मॅडीच्या खर्‍या आयुष्यात असलेली प्रेयसी कोण आहे? आणि दोघांची लव्ह स्टोरी कशी रंगली? हे आज आपण जाणून घेऊया. आज आर.माधवन 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. आणि या निमित्त त्याच्या लव्हस्टोरी बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .

आर.माधवनचा जन्म बिहारमधील जमशेदपूर या ठिकाणी झाला. माधवन लहानपणापासूनच खूप हुशार आणि जिज्ञासू मुलगा होता . माधवनने इंजीनीअरींगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे क्लासेस घायला सुरुवात केली होती.अशातच सरिता नावच्या मुलीने एयरहोस्टेस बनण्याकरिता माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासमध्ये अॅडमिशन घेतले. यादरम्यान माधवनला सरिता हळू-हळू आवडू लागली होती. क्लासपूर्ण झाल्यानंतर सरीताने माधवनचे आभार मानण्यासाठी डिनरसाठी विचारलं. आणि माधवनने त्या संधीचा फायदा घेत सरिताला थेट प्रपोज केलं. आणि काही दिवसातच त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघही जोडप्यांना एक मुलगा देखिल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

- Advertisement -

आर.माधवनच्या या अनोख्या लव्हस्टोरी बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.  माधवन त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही बोलत नाही. पण अनेकदा तो सोशल मीडियावर त्याच्या बायकोसोबत फोटो पोस्ट करतो. दोघही एकमेकांना आयुष्यात पुढे जाण्यास सपोर्ट करतात.

- Advertisement -

हे हि वाचा – इंडियन आइडलवर आरोपांचा भडिमार,TRPसाठी करावे लागते खोटे कौतुक सुनिधि चौहानचा खुलासा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -