घरदेश-विदेशयंदा अमरनाथ यात्रा रद्द! भक्तांची बाबा बर्फानींच्या दर्शनाची आस अपूर्ण

यंदा अमरनाथ यात्रा रद्द! भक्तांची बाबा बर्फानींच्या दर्शनाची आस अपूर्ण

Subscribe

कोरोना व्हायरस महामारीमुळे यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय

कोरोना व्हायरस महामारीमुळे यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. पूर्वी १० दिवस ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. यावर्षी होणारी अमरनाथ यात्रा धोक्यात असल्याने त्यापार्श्वभूमीवर सैन्यानेही देखील माहिती दिली आहे.

यावर्षी अमरनाथ तीर्थयात्रा २३ जूनपासून सुरू होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. २१ जुलै रोजी यात्रा सुरू होणार होती, पण जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार होती. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणूच्या नुकत्याच वाढलेल्या घटनांमुळे अनेक भागांना लखनपूर ते बालटालपर्यंत रेड झोन म्हणून घोषित केले गेले आहे.

- Advertisement -

देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ३० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात ३७ हजार १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहोचला आहे. यापैकी आता २८ हजार ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ लाख २४ हजार ५७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ लाख २ हजार ५२९ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


‘निमंत्रण आलं नाही, तरी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -