घरताज्या घडामोडीमहापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोनाबाधित

महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोनाबाधित

Subscribe

मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. घोले यांना दोन दिवसांपूर्वी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली. याचा अहवाल प्राप्त झाला असून ते पुढील उपचारासाठी महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले मागील अनेक दिवसांपासून विभागासह महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह रुग्णालयांना भेट देत आहेत. परंतु, मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी आपली चाचणी करून घेतली होती. अमेय घोले यांनी आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या सहकारी आणि मित्र परिवाराला सूचना देतानाच मागील चार दिवसांमध्ये जर माझ्या संपर्कात आल्यास घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास चाचणी करावी अशा सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाखेत कोरोना बाधित रुगणांच्या थेट संपर्कातील लोक भेटायला येत होते. त्यानंतर मागील शुक्रवारपासून त्यांना खोकला येऊ लागल्याने त्यांनी आपली चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि त्यांचे पती हरिष वरळीकर, नगरसेवक विजेंद्र शिंदे, भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे पती रोहिदास, नगरसेविका अश्विनी हांडे आणि त्याचे पती बाबा हांडे, नगरसेवक दत्ता पोंगडे आदींसह अनेक नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती. तर भाजपच्या मुलुंडमधील नगरसेविका रजनी केणी आणि त्याचे पती आणि मुलाला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे रजनी केणी यांचा गुरुवारी ९ जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याऐवजी मिठानगर शाळेतील कोरोना काळजी केंद्रात जाऊन उपचार घेतले होते.

भाजपच्या चेंबूर येथील एम/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – बेस्ट व्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव, विरोधी पक्षांनी केली सभागृहात मागणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -