घरदेश-विदेशआदिवास्यांनी केली अमेरिकन पर्यटकाची हत्या

आदिवास्यांनी केली अमेरिकन पर्यटकाची हत्या

Subscribe

अंदमान - निकोबार बेटावर फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकाची हत्या आदिवास्यांनी बाण मारून हत्या केली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

अंदमान- निकोबार बेट फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकाला बाण मारून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात अदिवस्यांना अटक केले आहे. हत्यानंतर या पर्यटकाचा मृतदेह काही काळ लपवून ठेवण्यात आला. त्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली होती. अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे आता दूतावासाने जाब मागितला आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय स्थरावर घेतली जात आहे. जॉन एॅलन चौ (२७) असे या पर्यटकाचे नाव आहे. या पर्यटकाने काही आदिवस्यांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पर्यटकाला मुशाफिरी करण्याची आवड

जॉन हा मूळ अमेरिकेतील नागरिक आहे. त्याला मुशाफिरी करण्याची आवड होती. काही दिवसांपूर्वी जॉन अंदमान येथे भटकंतीसाठी आला होता. त्याने यादरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. प्रवासादरम्यान जॉन बेटाच्या  उत्तर भागातील आदिवास्याची भेट घेतली. भेटीदरम्यान त्याने आदिवस्यांना धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदिवशांनी चिडून या पर्यटाकाला बाण मारून त्याची हत्या केली.

आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन याची हत्या बेटाच्या उत्तर भागात करण्यात आली. या क्षेत्रात सेन्टिनेली नागरिक राहतात. या आदिवास्यांचे अजूनही नागरिकरण झालेले नसून ते घनदाट जंगलात अश्मयुगीन जीवन जगत आहेत. बाहेरील जगाच्या संपर्कात राहणे त्यांना आवडत नाही. मच्छीमारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या अमेरिकन पर्यटकाला शेवटी या आदिवसी विभागातच बघण्यात आले होते. यानंतर हा पर्यटक बेपत्ता झाला. या पर्यटकाचा मृतदेह समुद्र किणाऱ्यावर गाडलेला आढळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -