घरदेश-विदेशदहशतवाद्यांचा कुलगाम येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला

दहशतवाद्यांचा कुलगाम येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला

Subscribe

जम्मू - काश्मीरमधील कुलगाममध्ये असलेल्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एक नागरिक जखमी झाला आहे.

पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केला. कुलगाममध्ये असलेल्या कॅम्पवर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जवानांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असून लष्कराच्या प्रत्त्युतरानंतर दहशतवाद्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. समोर आलेल्या माहितीनुसार गुरूवारी अर्थात आज सकाळी दहशतवाद्यांनी जम्मू – काश्मीरमधील कुलगाममधील स्कॉस्ट रिसर्च सेंटरजवळील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला चढवला. यावेळी एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. त्यानंतर लष्करानं शोध मोहिम हाती घेतली आहे. १७ नोव्हेंबर रोजी देखील दहशतवाद्यांनी एका नागरिकाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. हत्या करण्यात आलेला नागरिक लष्कराचा खबऱ्या होता असा संशय दहशतवाद्यांना होता. त्यातूनच त्या नागरिकाची हत्या करण्यात आली होती.

दिवसेंदिवस दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ होत असून जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -