घरमुंबईमुंबईत पहिलाच पाऊस जीवघेणा; ३ जणांचा मृत्यू तर ५ जखमी

मुंबईत पहिलाच पाऊस जीवघेणा; ३ जणांचा मृत्यू तर ५ जखमी

Subscribe

मुंबईला पहिल्याच पावसाने चांगले झोडपले आहेत. या पावसाने आतापर्यंत ३ जणांचा बळी घेतला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत.

मुंबईमध्ये पहिल्याच पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने मुंबईत तीन जणांचा बळी घेतला आहे. भरपावसामध्ये शॉक लागून मुंबईत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंधेरीमध्ये एकाचा तर गोरेगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अंधेरीमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर दादरच्या सेनापती बापट मार्गावर भिंत कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. तीन जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अंधेरीमध्ये जखमी झालेल्यांवर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

अंधेरीत एकाचा मृत्यू 

आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पावासाने सुरुवात केली. यामुळे एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची या पावसामुळे सुटका झाली खरी पण दुसरीकडे पावासाने ३ जणांचा बळी घेतला. पहिली घटना अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. साचलेल्या पाण्यातून जात असताना विज प्रवाह पाण्यामध्ये आल्यामुळे ६० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. काशिमा युडियार असं या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेला जवळच्या कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

- Advertisement -

गोरेगावमध्ये दोन जणांचा मृत्यू 

दुसरी घटना ही गोरेगाव पूर्वेला घडली आहे. गोरेगाव पूर्वेकडील दुर्गा माता मंदिराजवळ चार जणांना विजेचा धक्का लागला यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी हे चौघे जण रिक्षातून जात असताना त्यांना विजेचा धक्का बसला. जखमींना नजीकच्या ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर या दुर्घटनेमध्ये राजेंद्र यादव (६० वर्ष) आणि संजय यादव (२४ वर्ष) या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आशादेवी यादव (५ वर्ष) आणि दिपू यादव (२४ वर्ष) हे जखमी झाले आहेत.

दादरमध्ये तीन जण जखमी 

तर तिसरी घटना दादर परिसरामध्ये घडली आहे. सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदानात भिंत कोसळली. या घटनेमध्ये ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत तोडावले (४० वर्ष), विजय नागर (४० वर्ष) आणि चेतन तठे (२८ वर्ष) हे तिघे जण जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -