घरताज्या घडामोडीअनुराधा पौडवाल आई असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला झटका

अनुराधा पौडवाल आई असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला झटका

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना दिलासा मिळाला आहे.

केरळमधील करमाला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या आई असल्याचा दावा केला होता. तसेच तिने तिरुवनंतपुरम जिल्हा कौटुंबिक न्यायालयात पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. याशिवाय ५० कोटींची नुकसाना भरपाईचीही मागणी केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना दिलासा मिळाला आहे. तिरुवनंतपुरम कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यावर न्यायालयानं स्थगिती दिली आहे. याशिवाय करमाला या महिलेला नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

करमाला मोडेक्स हिला एका दाम्पत्याने चार दिवसांची होती त्यावेळी दत्तक घेतले होते, अशी माहिती करमालाच्या वडिलांनी तिला आपल्या मृत्यूपूर्वी सांगितली होती. तसेच ती अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचे देखील सांगितले होते. ‘अनुराधा पौडवाल यांनी मी अवघ्या चार दिवसांची असताना मला दुसऱ्या दाम्पत्याला दत्तक दिले होते. त्यांना त्यादरम्यान त्यांच्या करिअरकडे लक्ष द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला नाही’, असा दावा देखील त्या महिलेने केला होता.

- Advertisement -

अशा दर्जाच्या वक्तव्यांवर उत्तर देणं हे माझ्या मर्यादेच्या पलिकडचं असल्याचं अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं होत. करमाला यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं अनुराधा पौडवाल यांच्या प्रवक्त्यांनी देखील म्हटलं होतं.

याप्रकरणानंतर बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही आपली आई असल्याचा दावा एका तरुणाने केला होता. तसंच त्याने आपल्या आई म्हणजेच ऐश्वर्या सोबत मुंबईत राहायची इच्छा असल्याचे सांगितलं देखील होत. हा तरुण ३२ वर्षांचा असून आईव्हीएफद्वारे लंडनमध्ये त्याचा जन्म झाला असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – रजनीकांत यांना ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे शूटिंग पडले महागात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -