घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

Subscribe

औरंगाबाद-जालना रोडजवळ रात्री पावणे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरला क्रुजरनं धडक दिल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. इगतपुरी येथे देवदर्शन करून बुलडाण्यातील सिंदखेडराज येथे मृत प्रवासी परतत असताना हा भीषण अपघात झाला. मृत प्रवासी हे सिंदखेडराजाचे ग्रामस्थ आहे. काशिनाथ म्हत्रे (वय ६२), संगीत बुंदे (वय ४५), ऋषीधर तिडके (वय ५५) आणि रवी जाधव (वय ३२) असं या मृत प्रवाशांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा या तालुक्यातील काही ग्रामस्थ इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. हे सर्व भाविक गुरुवारी रात्री क्रुजर गाडीनं परतत असताना औरंगाबाद-जालना रोडवर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरवर क्रुजर मागच्या बाजूने धडकली. या अपघातमध्ये चार भाविक जागीच ठार झाल असून पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याचं समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -