घरताज्या घडामोडीAPJ Abdul Kalam Death Anniversary: 'पुढचा जन्म मेरठमध्ये घेऊ इच्छितो' असे...

APJ Abdul Kalam Death Anniversary: ‘पुढचा जन्म मेरठमध्ये घेऊ इच्छितो’ असे अब्दुल कलाम यांनी का म्हटले

Subscribe

मेरठ ठिकाणाशी अब्दुल कलाम यांचे फार जवळचे नाते होते

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam)  यांच्या विचारांनी देशातील अनेक तरुणांचे आयुष्य बदलले. त्यांचे संपूर्ण जीवन अनेकांसाठी प्रेरणदायी ठरले. अशा प्रेरणादायी व्यक्तमत्त्वाने २०१५ साली संपूर्ण जगला अलविदा म्हटले. २७ जुलै २०१५मध्ये शिलाँग IIMमधल्या एका कार्यक्रमात एपीजी अब्दुल कलाम यांचा अचानक कार्डियेक अरेस्टमुळे मृत्यू झाला. अब्दुल कलाम यांची आज सहावी पुण्यतिथी. मिसाइन मॅन ही अब्दुल कलाम यांची ओळख होती. भारताचे माजी राष्ट्रपती असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी इमानदारीच्या रस्त्याने देश चालवून देशातील सर्वात चांगले नागरिक बनून देश सर्वापेक्षा मोठा कसा बनेल याचे धडे त्यांनी दिले. मेरठ ठिकाणाशी अब्दुल कलाम यांचे फार जवळचे नाते होते. मला पुढचा जन्म देखील मेरठमध्ये घ्यायचा आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील हा किस्सा काय आहे जाणून घ्या.

२००८मध्ये  २७ मे रोजी अब्दुल कलाम MIIT कॉलेजमध्ये राजकीय स्वतंत्रता संग्राम संग्रहालय प्रदर्शनाचा शुभारंभाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी ते क्रांतीधरा विषय जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासावर अब्दुल कलाम फारच प्रभावीत झाले होते. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे कौतुक केले होते. हे राज्य माझ्या मनात भरले आहे असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. उत्तर प्रदेशमधील अनेक वीर क्रांतिकारकांचे कलाम यांनी खूप कौतुक केले होते. उत्तर प्रदेशला बेस्ट उत्तर प्रदेशचा दर्जा दिला होता. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मला पुढच्या जन्मी मेरठच्या धरतीवर जन्म घ्यायचा आहे जेणेकरुन जग मला क्रांतिधरा पुत्र म्हणून ओळखेल.

- Advertisement -

१८ ऑक्टोबर २०१३ रोजी IMA ला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अब्दुल कलाम पुन्हा एकदा मेरठला आले होते. यावेळी IMA ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे अब्दुल कलाम भाषण करणार होते. डॉक्टर अब्दुल कलाम यांची अनुमती मागण्यासाठी आले तेव्हा कलाम यांनी डॉक्टरांना मी या कार्यक्रमाचा हिस्सा का बनू? तुम्ही या समाजासाठी कशाप्रकारे योगदान देता? समाजासाठी तुम्ही काय करता? असे साधे पण विचार करायला लागणारे प्रश्न कलाम यांनी तिथल्या डॉक्टरांना विचारले होते.

अब्दुल कलाम असे एक राष्ट्रपती होते ज्यांना राष्ट्रपती होण्याआधी त्यांचा भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. १९९७ मध्ये कलाम यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Tokyo Olympics: मीराबाई चानूला २ कोटींचे बक्षीस आणि प्रमोशन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -