घरदेश-विदेशकोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेत जा,चीनने साधला अमेरिकेवर निशाणा

कोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेत जा,चीनने साधला अमेरिकेवर निशाणा

Subscribe

चीनी नेटकऱ्यांनी अमेरिकन फोर्ट डेट्रिक बायोलॅबची तपासणी करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केली होती.

 

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आर्थिक नुकसाना सोबतच अनेकांना मानसिक संकटाचा सामना करावा लागला. इतकेचं नाही तर असंख्य लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लगाला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूनचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. कारण अनेक तज्ञ लोकांच्या मते कोरोना व्हायरस हा महाभयंकर आजार चीन मधून पसरला असल्याचे बोलण्यात येत आहे. चीन मधील वुहान शहरात एका प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची उत्पत्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. आता पुन्हा एखदा चीनसमोर प्रयोगशाळांची तपासणी करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने चीनने संताप व्यक्त करत  स्पष्टीकरण दिले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, “जर प्रयोगशाळांची चौकशी करायची असेल तर डब्ल्यूएचओ तज्ञांनी फोर्ट डेट्रिकला जायला हवे. अमेरिकेने शक्य तितक्या लवकर पारदर्शक आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. तसेच या मार्गाचा अबलंब केल्यास नक्कीच जगासमोर लवकरच सत्य उघडकीस येऊ शकते,” असं वक्तव्य झाओ लिजियान यांनी केलं आहे.

- Advertisement -

चीनी नेटकऱ्यांकडून स्वाक्षरी मोहिम

ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार चीनी नेटकऱ्यांनी अमेरिकन फोर्ट डेट्रिक बायोलॅबची तपासणी करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केली होती. 1 कोटी 30 लाख चीनी नेटिझन्सनी या मोहिमेत सहभाग नोंदवला असल्याचे कळतेय.मात्र यावर अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.

- Advertisement -
झाओ लिजियांग संतापले

फोर्ट डेट्रिक येथील जैविक प्रयोगशाळेच्या तपासणी संदर्भात सर्व शंका तसेच प्रश्नाचे निरसण अमेरिकेने करायला हवं. तसेच अनेक लोकांकडून न्यायाची मागणी केली जात आहे अमेरिका अजूनही गप्प का आहे? आता दावा करणारी पारदर्शकता कुठे आहे? असे निवेदन झाओ लिजियांग यांनी ग्लोबल टाईम्सला दिलेल्या वृत्तात केलं आहे.

कोरोना व्हायरसची गळती होऊन एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली आणि नंतर तो जगभर पसरला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोविड -१९ च्या पहिल्या घटना वुहानमध्ये नोंदल्या गेल्या असल्याने, चिनी शहरातील प्रयोगशाळेला मुख्य संशयित मानले जात आहे.


हे हि वाचा – Covid Vaccine: किशोरवयीन मुलांसह आजारी मुलांना लसीकरणात प्रथम प्राधान्य; जाणून घ्या कधी मिळणार लस

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -