घरदेश-विदेशArvind Kejriwal: AAP नेत्याचा दावा; 2-3 दिवसांत केजरीवाल यांना अटक होणार

Arvind Kejriwal: AAP नेत्याचा दावा; 2-3 दिवसांत केजरीवाल यांना अटक होणार

Subscribe

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आप नेते संदीप पाठक, दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्वी भाजप ईडीच्या माध्यमातून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, आता ते सीबीआयच्या माध्यमातून हे काम करत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. (Arvind Kejriwal AAP leader claims Kejriwal will be arrested in next 2 3 days)

सौरभ भारद्वाज म्हणाले, ‘भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, त्यांना वाटते की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र आल्यास त्यांच्या अडचणी वाढतील आणि ज्या राज्यांमध्ये ‘आप’ची युती आहे तेथे भाजपला सरकार बनवणे कठीण होईल. आम्ही भाजप आणि केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, तुम्हाला केजरीवालांना अटक करायची असेल तर करा, पण अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसची युती कायम राहणार.

- Advertisement -

केजरीवाल यांना दोन-तीन दिवसांत अटक

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी CrPC कलम 41A चा वापर केला जाईल, असा दावा त्यांनी केला. आज, दिवसा किंवा संध्याकाळी, ती नोटीस केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर ईडीसह सीबीआय अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करतील. येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार असल्याची आमची माहिती आहे. मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, त्याच पद्धतीने ही अटक करण्यात येणार आहे.

सीबीआय कारवाई करू शकते- सौरभ भारद्वाज

भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘इंडिया ब्लॉकच्या बैठकीनंतर केंद्र कारवाई करू शकते हे अनेक राजकीय निरीक्षकांना समजले आहे. बातम्या येऊ लागल्या की आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती जवळपास निश्चित झाली आहे, दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला आहे, आज ना उद्या युतीची घोषणा होणार आहे, त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातवी नोटीस मिळाली आहे आणि आम्हाला अत्यंत विश्वासार्ह लोकांकडून माहिती मिळाली आहे की अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी सीबीआय पावले उचलत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Supriya Sule VS Sunetra Pawar : लोकसभेच्या तयारीला सुरुवात ? बारामतीत भेटीगाठी वाढल्या)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -