शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री हे शिवसेनेच्या तीन पिंढ्याच्या साक्षीदार आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेत सक्रीय होत असलेल्या दसरा मेळाव्यालाही त्यांची उपस्थिती होती.
मातोश्रीवर बाळासाहेबांसमवेत मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे.
शिवसेनेच्या एका पुस्तकाचे अनावरण करतेवेळी बाळासाहेब आणि मनोहर जोशी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत एका कार्यक्रमात मनोहर जोशी.
बाळासाहेबांचे खंदे समर्थक आणि निष्ठावंत मनोहर जोशी एका कार्यक्रमा दरम्यान बाळासाहेबांसमवेत
एका कार्यक्रमात पुत्र उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत असताना बाळासाहेब. यावेळी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी आणि राज ठाकरेही हजर होते.
सध्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे बाळासाहेबांना भेटण्यास मातोश्रीवर आले असताना इतर नेत्यांसोबत मनोहर जोशी हेसुद्धा हदर होते.