घरदेश-विदेशमत मागायला येतात त्यांना प्रश्न विचारा... 'जवान' चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत 'आप'चे...

मत मागायला येतात त्यांना प्रश्न विचारा… ‘जवान’ चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत ‘आप’चे ट्वीट

Subscribe

नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा जवान चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील संवादही लोकप्रिय होत आहेत. यातील एक संवाद आम आदमी पार्टीलाही (AAP) ‘आपलासा’ वाटत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच सांगत आले आहेत, अशी टिप्पणी आपने या संवादाचा संदर्भ देत केली आहे.

- Advertisement -

आम आदमी पार्टीने गुरुवारी रात्री केजरीवाल यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अरविंद केजरीवाल जे सांगत आले आहेत, तेच शाहरुख खानने जवान चित्रपटातील एका संवादात म्हटले असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – अजित पवार गटाचे दावे शरद पवार गटाने फेटाळले, निवडणूक आयोगाकडे दाखल केले उत्तर

- Advertisement -

शाहरुख या संवादात म्हणतो :
भीती, पैसा, जातपात, धर्म, संप्रदाय यासाठी मतदान करण्याऐवजी जे तुमचे मत मागायला येतात त्यांना प्रश्न विचारा.
त्याला विचारा तो माझ्यासाठी पुढील 5 वर्षांत काय करेल?
कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी तुम्ही काय कराल?
मला नोकरी मिळवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?
देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही काय कराल?

हेही वाचा – आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर…, आंबेडकरांकडून दोन्ही काँग्रेस लक्ष्य

आपने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देखील केजरीवाल हेच मुद्दे मांडताना दिसत आहेत. ते म्हणतात, ‘काही जण धर्माच्या नावावर मते मागतात, काही जण जातीच्या नावावर मते मागतात… तुमच्यासाठी शाळा आणि रुग्णालये बांधू, त्यामुळे आम्हालाच मतदान करा, असे सांगणारा कोणताही पक्ष आजपर्यंत पाहिलेला नाही. पण आम्ही अनावश्यक मुद्दे मांडणार नाही… तुमच्या मुलांबद्दल बोलू, तुमच्या भविष्याबद्दल बोलू… आम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ… सर्वांचे वैद्यकीय उपचार, चाचण्या मोफत करू… प्रत्येक बेरोजगार व्यक्तीसाठी रोजगाराची व्यवस्था करू आणि त्यांना रोजगार मिळेपर्यंत भत्ता देऊ…, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -