घरदेश-विदेशबाबा रामदेव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल केली टिप्पणी

बाबा रामदेव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल केली टिप्पणी

Subscribe

जयपूर : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या महिलांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यापाठोपाठ त्यांनी आता ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांबद्दल असेच एक वक्तव्य केले आहे. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका धार्मिक मेळाव्यात बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले.

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे केले. यावेळी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्यावरून वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

- Advertisement -

पन्नोनियो का तळ गावातील ब्रह्मलीन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला ते गेले होते. तिथे सभेला संबोधित करताना बाबा रामदेव म्हणाले, इस्लाम धर्मात पाच वेळा नमाज अदा केल्यानंतर काहीही करण्याची तुम्हाला मोकळीक आहे. कोणताही गुन्हा करू शकता. मुस्लिमांसाठी फक्त नमाज पठण करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर तुम्ही जे काही कराल ते सर्व न्याय्य आहे. हिंदू मुलींना उचलून न्या किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून तुमच्या मनात येईल ते करा, असे ते म्हणाले.

हे मी म्हणत नसून हे लोक तसे करत आहेत. मग ते म्हणतात की, तोकडे पायजमा घाला, मिशा कापा आणि टोपी घाला की, ‘जन्नत’मध्ये स्थान निश्चित झाले. तिकडे हुरे (अप्सरा) मिळतील आणि मदिरापान करायला मिळेल. पण अशी ‘जन्नत’ नरकापेक्षाही वाईट असल्याचे सांगून बाबा रामदेव म्हणाले, तरीही लोक मिशा कापतात आणि टोपी घालतात. हा वेडेपणा आहे. संपूर्ण जगाने इस्लाम धर्म स्वीकारावा, एवढाच विचार यांचा आहे.

- Advertisement -

ख्रिश्चनधर्मियांबद्दलही बाबा रामदेव यांनी टिप्पणी केली, चर्चमध्ये जा आणि मेणबत्ती लावा आणि येशू ख्रिस्तासमोर उभे रहा. सर्व पापे धुतली जातात, असे ते म्हणाले. पण सनातन धर्मात तसे नाही. ब्रह्म मुहूर्तावर झोपून उठा, देवाचे स्मरण करा. योग, ध्यान आणि सेवा करा. हा सनातन धर्म आहे. देवाने केवळ मानव जातीची निर्मिती केली. बाकीच्या जाती आपण सर्वांनीच निर्माण केल्या आहेत. हिंदू धर्म अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे. म्हणूनच तुमच्या धर्माविषयी जागरुक राहा आणि धर्मगुरूंच्या आवाहनानुसार नेहमी तत्पर राहा. धर्मगुरू तुम्हाला जेथे सांगतील तेथे उभे रहा, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -