घरताज्या घडामोडीBhaiyyu Maharaj-आत्महत्या प्रकरणी ३ जणांना सहा वर्षाची शिक्षा, शिष्या पलकसह दोन सेवक...

Bhaiyyu Maharaj-आत्महत्या प्रकरणी ३ जणांना सहा वर्षाची शिक्षा, शिष्या पलकसह दोन सेवक करत होते ब्लॅकमेल

Subscribe

भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांना प्रत्येकी सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मध्यप्रदेश येथील अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी इंदौर जिल्हा न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने भय्यू महाराज यांचा मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि शिष्या पलक यांना उपलब्ध पुराव्यांच्या आधारांवर दोषी ठरवले असून तिघांना प्रत्येकी सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ साली त्यांच्याच रिव्हॉलरमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. प्रकरण हायप्रोफाईल असल्याने देशभरात त्याची चर्चा होती. भय्यू महाराज यांच्यासारख्या शांत, संयमी लोकप्रिय गुरूने आत्महत्या केल्याने त्यांच्या भक्तगणांना धक्का बसला होता. भय्यू महाराज यांची राजकिय व्यक्तींशी जवळीक असल्याने त्यांच्या आत्महत्येवर तर्क वितर्क लढवले जात होते. आत्महत्या की हत्या यावरही देशभरात चर्चा सुरू होत्या. भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी आणि पहील्या पत्नीची मुलगी कुहू यांच्यात वाद होता. यामुळे या दोघींच्या वादाला कंटाळून भय्यू महाराज यांनी स्वता:ला संपवले अशाही वावड्या उठल्या होत्या.

- Advertisement -

मात्र तपासात शिष्या पलक, मुख्य सेवेकरी विनायक, ड्रायव्हर शरद हे य्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले. भय्यूजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्येही विनायकचा उल्लेख केला होता. कारण तो त्यांच्याकडे १६ वर्षांपासून काम करत होता. यामुळे भय्यू महाराजांचा तो सर्वाधिक विश्वासू सेवक होता.

यादरम्यान, कुहू आणि आयुष्यी यांच्यामुळेच भय्यू महाराजांनी स्वत:ला संपवल्याचे सगळीकडे पसरवण्यात आले. पण तपासात संशयाची सुई विनायक, पलक आणि शरदकडे जात होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. त्यावेळी पलक, विनायक, शरद भैय्यू महाराजांचे आर्थिक शोषण करत मानसिक छळ करत असल्याचे समोर आले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -