घरताज्या घडामोडीUAEमध्ये भारतीय आरोग्य कर्मचाऱ्याची मृत्यूवर मात; ६ महिन्यांमध्ये कोरोनाला 'असे' हरवले

UAEमध्ये भारतीय आरोग्य कर्मचाऱ्याची मृत्यूवर मात; ६ महिन्यांमध्ये कोरोनाला ‘असे’ हरवले

Subscribe

११८ दिवसांपर्यंत कृत्रिम फुफ्फुसांच्या मदतीने श्वास घेतल्यानंतर या आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोनावर केली मात

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने भयानक रुप धारण केले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशात बरेच लोकं कोरोनावर मात करण्यात यश मिळवत आहे. काही लोकं ५, ८ महिने कोरोनासोबत लढाई करून त्यावर मात करत आहेत. संयुक्त अरब अमीरातमधील (UAE) एका भारतीय आरोग्य कर्मचाऱ्याने ६ महिन्यांपर्यंत सुरू असलेली कोरोनासोबत लढाईत यश मिळवले आहे. कोरोनाला हरवणाऱ्या अरुण नावाचे व्यक्ती बरे झाले असून लवकरच ते आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटण्यासाठी केरळमध्ये येणार आहेत.

- Advertisement -

कोरोनाला हरवणारे अरुण कुमार एम नायर गेल्या १३ वर्षांपासून अबूधाबीमधील एलएलएच रुग्णालयात ऑपरेश थिअटरमध्ये (OT) टेक्निशियन म्हणून काम करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात अरुण अबूधाबीमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत होते. पण जुलै २०२१ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान UAEच्या हेल्थकेअर कंपनीने त्यांची खूप मदत केली.

अरुण कुमारांनी कृत्रिम फुफ्फुसांच्या माध्यमातून घेतला श्वास 

कोरोनाची लागण झाल्यानंतर अरुण यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. परंतु काही दिवसांत त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता एक धक्कादायक गोष्ट समोर आली. कोरोनामुळे त्यांच्या फुफ्फुसावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आणि त्यामुळे फुफ्फुसाचे नुकसान झाले होते. जेव्हा अरुण यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांना कृत्रिम फुफ्फुसांच्या (ECMO Machine) माध्यमातून श्वास देण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यांना यावेळेस हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना ट्रेकियोस्टोमी आणि ब्रोंकोस्कोपी करावी लागले.

- Advertisement -

अरुण यांच्यावर उपचार करण्यासाठी VPS हेल्थकेअरने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या हेल्थकेअर ग्रुपचे मालक भारतीय वंशाचे एक व्यावसायिक आहेत. या हेल्थकेअर ग्रुपने अरुण यांच्या पत्नीला नोकरीची ऑफर दिली असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पॉलिसी देण्याची घोषणा केली.

मित्रांनी पैसे गोळा करून केली आर्थिक मदत

११८ दिवसांपर्यंत कृत्रिम फुफ्फुसांच्या मदतीने श्वास घेतल्यानंतर अरुण ठीक झाले. आता ते कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी केरळमध्ये परतणार आहेत. अबूधाबीच्या बुर्जील रुग्णालयात अरुण ठीक झाल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी एक कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये अरुण यांना त्यांनी आर्थिक मदत केली. या कार्यक्रमात मल्याम अभिनेता, ‘मिन्नल मुरली’ चित्रपटाचा स्टार टोविनो थॉमस उपस्थित होता. तो म्हणाले की, ‘अरुणने एका सुपरहीरोप्रमाणे संसर्गावर मात केली आहे.’ तसेच ठीक झाल्यानंतर अरुण म्हणाले की, ‘मला काही आठवत नाहीये. पण मी मृत्यूच्या संकटातून बाहेर आलो आहे, हे मला समजते. हे माझे कुटुंबिय, मित्र आणि शेकडो लोकांच्या प्रार्थनमुळे झाले आहे.’


हेही वाचा – Booster Dose: भारत बायोटेकच्या Intranasal Booster डोसच्या ट्रायलला DCGIची मंजूरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -