घरElection 2023वसुंधरा राजेंनी केली राजस्थानच्या CM ची घोषणा, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री; दीया...

वसुंधरा राजेंनी केली राजस्थानच्या CM ची घोषणा, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री; दीया कुमारी उपमुख्यमंत्री

Subscribe

नवी दिल्ली – राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला आहे. मोदी-शहांनी राजस्थानातही धक्कातंत्राचा वापर करत वसुंधरा राजे यांच्या नावावर फुली मारत भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आहे. राजस्थानचे पर्यवेक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे आज दुपारी जयपूरला पोहचले. त्यांनी आमदारांची भेट घेतली, त्यानंतर राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांच्यासोबत वन टू वन बैठक केली. दुसरीकडे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. त्यानंतर दुपारी सव्वाचार वाजता भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : संघाशी संबंधीत, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, पहिल्यांदा आमदार अन् Bhajanlal यांना थेट मुख्यमंत्री पदाची खुर्ची

- Advertisement -

दोन उपमुख्यमंत्री

भाजपच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस वसुंधरा राजे यांनी केली. त्यासोबतच दीया सिंह आणि प्रेम चंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदी वासूदेव देवयानी यांच्या नावाची घोषणा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

- Advertisement -

 

अखेर सस्पेन्स संपला..

राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स तब्बल नऊ दिवस कायम राहिला. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले मात्र भाजप नेत्यांची खरी परीक्षा त्यानंतर सुरु झाली. राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्याची निवड करणे हे मोठे आव्हान भाजपसमोर होते. भाजपने कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणुन निवडणुकीत प्रमोट केले नाही, त्यामुळे अनेक नेते हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते. अखेर, मुख्यमंत्री पदाची चर्चा भजनलाल शर्मा यांच्या नावावर येऊन थांबली.


राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा होती, वसुंधरा राजे यांच्या नावाची. त्यांनी याआधीही राजस्थानचे मुख्यमंत्री पद सांभाळलेले आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये भाजपचे पोस्टर बॉय ठरलेले बाबा बालकनाथ यांचे नावही चर्चेत आले होते. त्यासोबतच दीया कुमारी, राज्यवर्धन राठोड, गजेंद्र शेखावत, सीपी जोशी यांच्याही नावाची चर्चा होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -