घरताज्या घडामोडीBharat Bandh ALERT! २७ सप्टेंबरला 'भारत बंद'; काय सुरू, काय राहणार बंद?

Bharat Bandh ALERT! २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’; काय सुरू, काय राहणार बंद?

Subscribe

पुन्हा एकदा ‘भारत बंद’ होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मोदी सरकारने तीन कृषी कायदे पास करून एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर घेराव घातला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहे.

देशभरात आता संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चा व्यक्तिरिक्त आणखी बरे काही शेतकरी संघटना या विरोधी आंदोलनात सामील होणार आहे. किसान संघटना म्हणाली की, ‘भारत बंद’ हा शांतीपूर्ण असेल.

- Advertisement -

भारत बंद किती वाजता सुरू आणि बंद होणार?

२७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ सकाळी सहा वाजता सुरू होईल आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत असेल. यादरम्यान कोणत्याही प्रकाराचा आवाज होणार नाही, सर्व आवाजावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यालय, बाजार, दुकानं, कारखाने, शाळा, कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्थाना खुले ठेवण्यासाठी परवानगी दिली नाही आहे. ‘भारत बंद’ दरम्यान रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवांसह आपात्कालीन सेवांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारत बंद दरम्यान हे असणार बंद

  • केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व कार्यालये आणि संस्था बंद राहतील.
  • बाजार, दुकानं आणि उद्योग, शाळा, कॉलेज, विद्यापिठ आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद असतील.
  • सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहने बंद असतील.
  • कोणत्याही प्रकारचे सरकारी किंवा बिगर सरकारी सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.

भारत बंद दरम्यान हे असणार सुरू

  • रुग्णालय, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका आणि कोणत्याही आरोग्य सेवा सुरू राहतील.
  • कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक (अग्निशमन दल, आपत्ती निवारण इ.) किंवा वैयक्तिक अडचण (मृत्यू, आजारपण, लग्न इ.) यावर सूट देण्यात आली आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या मार्गदर्शक सूचना

संयुक्त किसान मोर्चाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संयुक्त मोर्चाने म्हटले आहे की, ‘भारत बंद’ दरम्यान लोकांना स्वेच्छेने बंद करण्याचे आवाहन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नका. या आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड होता कामा नये. ‘भारत बंद’ सरकार विरोधात आहे, जनतेचा विरोधात नाही.

- Advertisement -

हेही वाचा – International Day of Peace 2021: आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -